दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होणार गुढीपाडवा

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होणार गुढीपाडवा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तांपैकी (Out of three and a half moments) एक असलेला गुढी पाडव्याचा (Gudipadva) सण उद्या तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या निर्बंधातून (corona restriction) मुक्त होवून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate with enthusiasm) होणार आहे. या सणाच्या खरेदीसाठी सुवर्णपेढींसह बाजारपेठेत प्रचंडी गर्दी झाली होती.

दोन वर्षांपासुन कोरोनाचे (corona) सावट असल्याने सर्वच सण कोरोनाच्या निर्बंध लादून साजरे केले जात होते. परंतु राज्य सरकाने राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेवून गुढीपाडव्यापासून (Gudipadva) सर्व सण निबर्ंध मुक्त साजरे करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सणचैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्यापासून (Gudipadva) हिंदू नववर्षाचे पंचांग (Hindu New Year Almanac) सुरु होत असल्याने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने यादिवशी अनेक जण सोने-चांदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह गृहप्रवेशासाठी मुहूर्त निश्चित करीत आहे. हा मुहूर्त साधण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरु झाली असून सुवर्णपेढ्यांसह गृहप्रवेशासाठी नागरिक सज्ज झाले असून त्यांच्याकडून तयारी देखील केली जात आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर्सची लयलूट

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी (Purchase of electronics items) करीत असतो. या दिवशीचा मुहूर्त साधत ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी दुकानदारांसह विविध कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तंवर आकर्षक सुटस ऑफर्सची लयलूट करीत आहे.

गुढी पाडवा होणार गोड

गुढी उभारतांना त्यावर साखरेचे हार कंगणे (Sugar necklace bracelet) लावली जातात. दम्यान, बाजारपेठेत ठिकठिकाणी हार कंगण विक्री करणार्‍यांनी दुकाने थाटली असून ग्राहकांकडून त्याची खरेदी केली जात आहे. दरम्यान, यंदा हार कंगणाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचे वाढ झाली नसल्याने यंदा गुढीपाडवा गोड होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com