धरणगाव कृउबा समितीवर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची एकहाती सत्ता

महायुतीला १२ जागा तर महाविकास आघाडीला ६ जागा
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

धरणगाव - प्रतिनिधी dharangaon

धरणगाव-एरंडोल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी गट यांच्या महायुती सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, ठाकरे गटाचे नेते सुरेशनाना चौधरी, तसेच ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार ताकद लावली होती. ती अपयशी ठरली. यातील उद्योजक सुरेशनाना चौधरी यांची जागा प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यांचा विजय महाविकास आघाडीला समाधान देणारा आहे.

गुलाबराव पाटील
पाचोरा कृउबा ; बहुमताचा कौल पालटला ; आ.किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलची नऊ जागांवर सरशी!

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

हमाल मापाडी मतदारसंघ - माळी ज्ञानेश्वर वसंत (१९९), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती - पवार संजय जुलाल (५०३), सेवा सहकारी सोसायटी विजा भज विमाप्र - धनगर दिलीपराव उत्तमराव (५७७), सेवा सहकारी सोसायटी इतर मागासवर्ग - पाटील रमेश माणिक (६२८), सेवा सहकारी सोसायटी महिला राखीव - पाटील लताबाई गजानन (५१९), पाटील रेखाबाई ईश्वर - (४९७), ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक - पाटील प्रेमराज परशुराम (४९०), सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण - सुरेश सिताराम चौधरी (५५५), पवार सुनील दत्तात्रय (५३२),पाटील सुदाम सेंटर (५१७), पाटील जिजाबराव गिरधर (५१५), पाटील रघुनाथ धडकू (५०७), पाटील किरण शांताराम (५०६), पाटील रंगराव दोधू (५०३), व्यापारी मतदारसंघ - करवा नितीन ननलाल (१५३), काबरे संजय रमेश (१४४),ग्रामपंचायत सर्वसाधारण - चौधरी सुरेखा देविदास (४८५), पाटील रवींद्र भिलाजी (४४१).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com