अन्नधान्य, डाळीवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांना झळ

5 टक्के नव्याने जीएसटी लावण्याचा केंद्राचा निर्णय अन्यायकारक
अन्नधान्य, डाळीवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांना झळ

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

केंद्र सरकारने (Central Government) नॉन ब्रँडेड अन्नधान्य व डाळीवर (non-branded cereals and pulses) पाच टक्के नव्याने जीएसटी (Five per cent new GST) लावण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे लहान व्यापारी संकटात (Merchant in crisis) सापडेल. शिवाय शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहचणार (harass the citizens) आहे. आधीच महागाई त्यात पुन्हा महागाईचा उच्चांक (High inflation) होईल. परिणामी, सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होईल. त्यामुळे जीएसटीचा निर्णय (GST should be reversed) मागे घ्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलन (Intense movement) करण्यात येईल. असा इशारा जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनने (District Market Yard Merchants Association) नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे.

पंतप्रधानांनी शब्द पाळावा

अन्नधान्यावर जीएसटी लागणार नाही. असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. असे असतांना जीएसटी लावण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आधीच जनता महागाईने त्रस्त आहे. खाद्यपदार्थांचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक अन्नधान्यावरील जीएसटीचा निर्णय अन्यायकारक आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणारा जीएसटीचा निर्णय रद्द करावा आणि पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळावा. अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.

चेबर ऑफ कॉमर्स आणि कॅटच्या निर्णयाला पाठिंबा

जीएसटी आकारण्यात येवू नये अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे. अन्नधान्य व डाळीवर आकारण्यात येणार्‍या जीएसटीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाणार आहे. किंबहूना, महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीएसटी आकारु नये. तसेच दि. पुना चेंबर ऑफ कॉमर्स आणि कॅट हे जो निर्णय घेतील या निर्णयाला मार्केट यार्ड व्यापारी असो.चा पाठिंबा राहील असा ठराव घेण्यात आला.

यावेळी असो.चे अध्यक्ष अशोक राठी, राधेश्याम लाहोटी, अरविंद बरडीया, प्रकाश वाणी, नरेंद्र अग्रवाल, अल्केश ललवाणी, अनिल जैन, दीपक महाजन, सुनील तापडीया, शशिकांत बियाणी, विष्णूकांत मनियार, वासुदेव बेहेडे, जयप्रकाश समदानी, पुरुषोत्तम अग्रवाल, प्रवीण जाखेटे, प्रफुल्ल दहाड, जगदिश वाणी, अशोक चौधरी, राजेश जोशी, जितेंद्र काबरा, जगन खडसे, संदीप जाखेटे, संजय पाटील, निलेश जाखेटे, गणेश कोटेचा, सी.ए.नितीन झंवर आदींची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com