ग.स.सोसायटीची आज मतमोजणी!

ग.स.सोसायटीची  आज मतमोजणी!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (Co-operative Credit Bureau of District Government Servants) अर्थात ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. दि.30 एप्रिल रोजी 8 वाजेपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary of North Maharashtra University) हॉलच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी (Counting of votes) 69 टेबलांवर 207 मतदान अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. मतमोजणीची सहकार निवडणूक विभागाकडून (Co-operative Election Department) तयारी पूर्ण करण्यात आली असून 21 जागांसाठी 115 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शनिवारी होणार आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी दि.28 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर मतदान (Voting) प्रक्रिया राबविण्यात आली होती. जळगाव शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रासह जिल्ह्यातील 15 केंद्रांवर 32 हजार 44 मतदानापैकी 25 हजार 390 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून या निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान (Voting) झाले आहे. आता दि.30 रोजी होणार्‍या मतमोजणीकडे (Counting of votes) उमेदवारांसह मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ग.स.सोसायटीच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी लोकसहकार, लोकमान्य (संस्थापक प्रगती) गट, सहकार गट, प्रगती शिक्षक सेना गट, स्वराज्य पॅनल यांच्यासह अपक्ष उमेदवार असे एकूण 116 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दि. 30 रोजी या पाच पॅनलसह अपक्ष उमेदवारांचा फैसला मतमोजणीनंतर होणार आहे.

प्रथम बाहेरील मतदार संघाच्या मतमोजणीला होणार प्रारंभ

मतमोजणीसाठी 69 टेबल लावण्यात आलेले आहेत. 69 टेबलांवर मतदान अधिकार्‍यांसह कर्मचारी असून एकूण 207 कर्मचारी नियुक्त केले आहे.7 सहाय्यक निबंधक अधिकारीही या ठिकाणी नियुक्त केले आहे. एका पॅनलसाठी 69 मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे. सुरुवातीला बाहेरील मतदार संघाच्या मतमोजणीला (Counting of votes) प्रारंभ होईल. त्यानंतर स्थानिक मतदार संघ, राखीव मतदार संघ अशी मतमोजणी होणार आहे.

14 तासात संपूर्ण मतमोजणीवर भर

दि.30रोजी सकाळी 8 वाजता मतपत्रिकांची छाननी (Scrutiny of ballot papers) करुन कलर व पांढर्‍या पत्रिका वेगवेगळ्या करुन नंतर एकाच टेबल 69 कर्मचारी मतमोजणी करतील.प्रथम बाहेरील मतदार संघासाठी 4 ते 5 तास लागेल. त्यानंतर स्थानिक मतदार संघासाठी 2 ते 3 तास आणि राखीव महिला मतदार संघासाठी 2 ते 3तास अशी मतमोजणी होणार आहे. तसेच 5 टेबलांवर पॅनलनिहाय मतमोजणी (Counting of votes) होईल. 12 ते 14 तासात संपूर्ण मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

21 उमेदवारांचे भाग्य आज खुलणार

ग.स.सोसायटीसाठी झालेल्या चुरशी निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 115 उमेदवार (Candidate) मैदानात उतरले होते. गुरुवारी मतदान झाल्यानंतर कोण विजय होणार आणि कोण पराभूत होणार, मातब्बरांना पराभूत करुन परिवर्तनाची लाट येणार याविषयी चर्चा रंगत आहे. काल झालेल्या तालुकानिहाय मतदनावरुन जाणकारही कोणत्या गटाला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, 21 उमेदवारांमध्ये कोणाचे भाग्य खुलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com