Video ५२ सेकंद उभे राहून जिल्हावासियांनी राष्ट्रगीताचा राखला मान

जळगाव - jalgaon

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आज दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभरात राष्ट्रगीत (National Anthem) गायन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालये, खाजगी आस्थापने, शाळा, कॉलेजेस, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तथा सर्वसामान्य नागरिक यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत समूह राष्ट्रगीताचे गायन केले. विशेष म्हणजे राष्ट्रगीत सुरू होताच जेथे जेथे हे गीत कानी पडले त्याठिकाणी आहे त्या स्थितीत जागेवरच उभे राहून जिल्ह्यातील नागरीकांनी राष्ट्रगीताचा मान राखला.

‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमात जिल्हावासियांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले होते, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com