
जळगाव - jalgaon
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत "स्वराज्य महोत्सव" उपक्रम राबविणेबाबत शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा, विद्यापीठ (School, University) व महाविद्यालय (College), शैक्षणिक संस्था यामधून दि.9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल.
जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील (Government office) अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील,
तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी होण्याचे आवाहन करणेत येत आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.