Accident गटविकास अधिकारी अपघातात ठार

अमळनेरसह यावल तालुक्याचा होता अतिरिक्त कार्यभार
Accident गटविकास अधिकारी अपघातात ठार

अमळनेर/यावल - प्रतिनिधी Amalner

आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (accident) अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला (nashik) जात होते अमळनेर-धुळे (dhule) या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी एमएच १९ डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळ गाठले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

एकनाथ चौधरी हे अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हा अपघात धरणगाव तालुक्यात झाला असून एकनाथ चौधरी यांचा मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.

मीत भाषी व्यक्तीमत्व

एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती यावल येथेच त्यांना पंचायत समितीच्या कार्यभार मिळावा म्हणून यावल तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नामदार गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करीत होते.

एकनाथ चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला असून दुपारी चार वाजता तरवाडी ता.चाळीसगाव यामूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com