डॉ.बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी : महापौर जयश्री महाजन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
डॉ.बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी : महापौर जयश्री महाजन

जळगाव - Jalgaon

विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन वेळोवेळी नियम लागू करीत असतात. प्रत्येक जळगावकराने संविधान आचरणात आणून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन यांनी रेल्वेस्थानकाबाहेरील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, नगरसेवक चेतन सनकत, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, अजय घेगट व मनपा अधिकारी आणि समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियम पाळून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी शांततेत आणि गर्दी न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास यावे असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com