
जळगाव - jalgaon
महाराष्ट्र (maharastra) विधान परिषदेच्या नाशिक (nashik) विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी (election) मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी विशेष नैमित्तिक रजा मिळणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी कळविले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दि.30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते दु.4.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजविता यावा, याकरिता ही रजा नियमित अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त विशेष रजा असेल, असेही श्री.हुलवळे यांनी कळविले आहे.