एसएसबीटी अभियांत्रिकीस नॅकचे ‘अ’ श्रेणीचे मानांकन

एसएसबीटी अभियांत्रिकीस नॅकचे ‘अ’ श्रेणीचे  मानांकन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

श्रम साधना ट्रस्ट संचलित (Shram Sadhana Trust) अभियांत्रिकी महाविद्यालयास (College of Engineering) नॅक समितीतर्फे (NAAC Committee) मागील महिन्यात भेट देण्यात आली होती व त्याचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयास नॅकतर्फे ‘अ’ श्रेणीचे (Grade 'A' by NAC) मानांकन प्राप्त (Rating received) झालेले आहे. एकूण सीजीपीए 3.14 आलेला असून महाविद्यालयात असलेल्या सोयीसुविधा, शिक्षण पद्धती आदी बाबींचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनायक यांनी सांगितले.

महाविद्यालयास ए ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक व विश्वस्त रावसाहेब शेखावत यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले आहे.

श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय 1983 पासून देशातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे. महाविद्यालयात कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, ई अँड टी सी, एमबीए, एमसीए अभ्यासक्रम शिकविले जातात. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे एनबीए व नॅक या राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र मूल्यांकन संस्थांद्वारे महाविद्यालय स्वतंत्रपणे एनबीएद्वारे तीन वेळा व नॅकद्वारे एक वेळा असे 4 वेळा यापूर्वी मूल्यांकित करण्यात आले आहे.

दर पाच वर्षांनी महाविद्यालयास मूल्यांकनासाठी सामोरे जायचे असते. यावेळी दुसर्‍यांदा महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषद अर्थात नॅक समिती महाविद्यालयास 4 व 5 ऑगस्ट रोजी भेट दिली होती.

महाविद्यालयाचे मूल्यांकन आणि गुणवत्ता - दर्जा निश्चित करण्यासाठी वर्गखोल्यांसह शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपलब्ध असलेली साधन सामग्री, शिक्षण पद्धती, विविध मॉडेल्स मधील मूल्यांकन मुद्दे आदी विविध निकषांवर समिती पाहणी व चर्चा करीत असते. त्यानंतर मूल्यांकनासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती, मूल्यमापनातील घटक, प्राप्त माहितीचे संकलन व पृथकरण करणे, मूल्यांकनाचा अहवाल तयार करणे आदी कार्य समितीचे सदस्य करतात.

परीक्षा,ग्रंथालय, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, अँटी रॅगिंग, तक्रार निवारण, एन एस एस ,स्पर्धा परीक्षा, रोजगार मार्गदर्शन, नियतकालिक ,सांस्कृतिक माहितीपत्रक, विविध स्पर्धा आदी विविध समित्यांनी सुकाणू समिती सोबत काम केले. त्यामुळे हे महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सांघिक प्रयत्नाचे यश असल्याचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनायक व नॅक समितीचे समन्वयक प्रा.डॉ.एस.आर.सुरळकर यांनी नमूद केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com