गोविंदा आला रे... आला...!

कोरोनाच्या सावटानंतर मोठ्या जल्लोशात कृष्णाष्टमी साजरी
गोविंदा आला रे... आला...!

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

गोपाळ काला (Gopal Kala) निमित्ताने शहरासह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन श्रीकृष्णांचा जन्मोत्सव (Krishna's birthday) साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षात कोरोनाच्या सावटा खाली कृष्णजन्मोत्सव साजरा झाला होता. यावर्षी मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात (great excitement) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ताप्ती पब्लिक स्कुल-

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी कृष्णाचा तर विद्यार्थिनींनी राधाचा पोशाख धारण केला होता. यावेळी शाळेत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.

कृष्णा जन्माष्टमीचे गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले व एकच जल्लोष केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका निना कटलर, शिक्षिका सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, वंदना मेढे, भारती मेढे, श्वेता जोशी, सुरिंदर कौर, अनिता खडसे, दीपाली बडगुजर, कल्पना वारुळकर, जसीम बाबू, मेहराज पठान, कविता इंगळे, अनिता शिंदे, पोर्णिमा भोळे, अंजली जोशी, माधुरी कोळी, बर्नाडित रॉस, मार्था राठोड, स्वाती तावरे, पुनम फालक, सुनीता वाणी, रेखा मावळे, सुवर्णा राजपूत, आरती पाचपांडे, अभिषेक राठोड, व्हर्जिनिया बर्नड, मोतीमेरी जॉन, स्मिता नन्नवरे, फे डिसौजा, रुथ क्लॅन्सी, आयुषी अग्रवाल, नेहा वाघमारे सह इतर शिक्षिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेश फालक, भरत भारंबे, पुष्कर पाटील, लतीता सोनार, रोहीणी पाटील, उषा भारंबे, संगीता चौधरी यांनी परिश्रम घेतले.

पुं.ग. बर्‍हाटे विद्यालय-

जन्माष्टमी व गोपाळकाला दहीहंडी फोडून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, सदस्य रमाशंकर दुबे, सचिव सुभाष बर्‍हाटे उपस्थित होते. परीक्षित बर्‍हाटे यांनी बाळकृष्णाचे पूजन केले, विद्यार्थी व विद्यार्थीनी राधाकृष्णच्या वेशात आले होते. कृष्णा बनुन आलेल्या विद्यार्थाने दहीहंडी फोडली. त्यानंतर गोपाळ काल्याच्या प्रसाद सर्वाना देण्यात आला, कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या शिक्षिका जयश्री चौधरी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हेमांगीनी चौधरी उपस्थित होत्या, यशस्वीतेसाठी मीनाक्षी चौधरी, ममता फालक, सुनीता बर्‍हाटे, समीर तडवी, दीपक तायडे, सुनीता पाटील, रुपाली गाजरे, दीपाली सरोदे, कमलाकर झोपे यांनी परिश्रम घेतले.

द वर्ल्ड स्कूल -

श्री कृष्ण जन्माष्ठमीनिमित्त दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेच्या विविध वेशभूषा परिधान करून विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करत दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी रोहित कोलते, मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी सर्व विद्यार्थ्यांना व बाल गोपालांना श्री कृष्ण जन्माष्ठमिनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कोटेचा महीला महाविद्यालय -

कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थिनींनी संगीत खुर्ची, दहीहंडी फोडणे असे कार्यक्रम सादर केले. प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या वेशभूषेत कल्याणी पाटील आणि राधेच्या वेशभूषेत मेघना भारद्वाज व गोपिकेच्या भूमिकेमध्ये नयना सपकाळे, पूजा हडपे, हर्षा तायडे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

प्रास्ताविक प्रा. दिपाली पाटील यांनी केले. आयोजन प्रा. निलेश गुरचल, प्रा. सचिन पंडित, प्रा. सुरज हेडा, डॉ. गिरीश कोळी, प्रा. विनोद भालेराव, प्रा. गिरीश सरोदे, मनिषा इंगळे यांनी तर आभार कल्याणी पाटील या विद्यार्थिनीने मानले.

एन.के. नारखेडे स्कुल -

गोपाळ काला उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सस्था सेक्रेटरी पी. व्ही. पाटील, ऑ. जॉ. सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सभासद विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका हरीप्रिया सपकाळे, उपमुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी राखी बढे, उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दहिहंडी फोडून सांस्कूतिक कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापिका हरीप्रिया सपकाळे याननी आभार मानले.प्रसंग शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

श्रीराम मंदीर -

सकाळीच श्रीकृष्णांच्या प्रतिमेचे पुजा अर्चा अभिषेक करणञयात आला. महिला मंडळातर्फे भजने झाली. रात्री 12 वाजता गोपाळकाला निमित्ताने कार्यक्रम झाले. यावेळी मंदीराच्या अध्यक्षा सरीता चौक, रश्मी कुलकर्णी, सिमा डोलारे, मनीष इखे, सरोज कविश्वर, प्रगती कुलकर्णी, धनश्री जोशी,सुनीता कुलकर्णी, कल्पना दामले, स्मिता दुसाने, विशाखा नाईक, प्राजक्ता चौक, प्रज्ञा कुलकर्णी, पल्लवी गचके, राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोेटेचा, नमा शर्मा, अशिष कुलकर्णी, पंकज चौक, दिलीप लोंढे, सुभाष शिरसाळे, हेमंत बर्‍हाटे, रामभाऊ गचके, छाया जोशी, अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.

राजस्थानी नवयुवक विप्र समाज -

समाजाचे अध्यक्ष विनोद शर्मा यांच्या कार्यालयात श्रीकृष्णजयंती निमित्त फुल पाकळ्यांची उधळण करुन मिठाईचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी विनोद शर्मा, प्रा. दिनेश राठी, जे. बी. कोटेचा, सुनील ठाकुर, पाप शर्मा, सत्यनारायण शर्मा, रमेश शर्मा, रामवल्लभ झंवर, अनुप अग्रवाल, राधेश्याम लाहोटी, गोपाळ चांडक, ताराचंद शर्मा, जग्गु अग्रवाल, अ‍ॅड. गोकुळ अग्रवाल. कैलास डिडवाणी,

सुनसगाव -

येथील दादासाहेब दामू पांडू पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, पेंद्या, सुदामा, तसेच सवंगड्यांची भूमिका पार पाडली. यानिमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जागेवर उभी केलेली दहीहंडी फोडली. प्राथमिकच्या शिक्षिका सरला सोनवणे, चित्रा कोळी यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीबद्दल माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com