पातोंडा परिसर विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार

पातोंडा परिसर विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार

अमळनेर Amalner

  पातोंडा परिसर विकास संस्थेला (Patonda Area Development Institute) सन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award) 2018-19 अंतर्गत विभागस्तरावर सेवाभावी संस्थेच्या (charitable organization group) गटात द्वितीय क्रमांक (Second place) जाहीर (Announced) झाला असून पुढील महिन्याच्या 10 तारखेला विभाग स्तरावर पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार दिला जाणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रुपये पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश संस्थेला प्राप्त होणार आहे. या पुरस्काराचे पातोंडा ग्रामस्थांकडून व पंचक्रोशीतून संस्थेचे व वृक्ष चळवळीसाठी झटलेल्या वृक्षप्रेमींचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.शासनाने राज्यातील वनीकरणाच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना सन्मानित करण्यासाठी सन 1988 पासून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना सुरु केलेली आहे.

पातोंडा येथील पातोंडा परिसर विकास संस्था ही देखील गेल्या चार ते पाच वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनात मोठी भूमिका बजावत असून आजपर्यंत हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करून त्यांचे यशस्वीरित्या संवर्धन केलेले आहे. पातोंडा अमळनेर रोडवर असलेल्या ध्यान केंद्र परिसर, बस स्टॅण्ड परिसर, माहिजी देवी रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून त्यासोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत बिहार व मियावाकी पॅटर्नच्या सहाय्याने हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड झाली असून ते वृक्ष देखील आज दिमाखात डौलताना दिसत आहे.

ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, पर्यावरण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असून आज विविध स्तरांवरील पुरस्कार संस्थेला प्राप्त झाले आहेत. बिहार पॅटर्न अंतर्गत झालेल्या वृक्षारोपण वेळी ग्रामस्थांकडून विरोध झाला होता पण त्याच बिहार पॅटर्न अंतर्गत आज तेथील वृक्ष मोठ्या दिमाखात हरियाली निर्माण करत असून पुरस्काराचे श्रेय सर्व वृक्षलागवडीसाठी झटलेल्या सर्व मावळयांना दिले जात आहे. आणि विरोधाभास निर्माण करणाऱ्या लोकांकडून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.

माणसांनी आपले निखर व प्रामाणिक पणे केलेल्या कामाला कितीही सामूहिक विरोध झाला तरीही आपण ते काम सत्याने केले तर त्याचे फळ निश्चित मिळते आणि ते फळ चाखायला सर्व स्तरावरील लोक सामूहिकपणे उभे राहतात यांच्यातच माणसाचे खरे यश उभे टाकत असते याची प्रचिती ग्रामस्थांना या निमित्ताने दिसून आली. केलेल्या वृक्ष लागवडीचे तरुणाईने खड्डे खोदण्यापासून ते बादलीने पाणी देण्याइतपत कामे निस्वार्थीपणाने जबाबदारीने पार पाडले असून इतर गावांना आदर्श ठरणारी वृक्ष चळवळ पातोंडयात आज विराजलेली आहे. ह्या पुरस्काराने पातोंडा गावाची नावलौकिकता नक्कीच वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com