जळगावच्या नेहा मोता हिला 10 लाख 60 हजारांची शिष्यवृत्ती

भारत सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवणारी जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी
जळगावच्या नेहा मोता हिला 10 लाख 60 हजारांची शिष्यवृत्ती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगावातील रहिवासी तसेच सद्या आयआयएम बैंगलुरु येथे एमबीएच्या दुसर्‍या वर्षात शिकत असलेली नेहा मोता हिला भारत सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयातर्फे 10 लाख 60 हजारांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. भारत सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवणारी जिल्ह्यातून पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

भारत सरकारच्या केंद्रीय विभागातील अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयातर्फे 2020-21 या शैक्षणिक वर्षांकरीता ‘मेरिट कम मिन्स् स्कॉलरशिप’ अंतर्गत नेहा मोता हिला 10 लाख 60 हजारांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.

नेहा ही बैंगलुरु येथे एमबीएच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने बी.टेकची पदवी प्राप्त केली असून, एनटीसी शाखेतून तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

शालेय जीवनापासूनच नेहाने विविध शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. इयत्ता 7वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती, 2009 मध्ये दिल्ली येथील नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप, 2010-11 मध्ये एनसीईआरटी इन्स्पायर अवार्ड तर 2013 मध्ये धीरुभाई अंबानी रिलायन्स फाऊंडेशनची स्कॉलरशिपदेखील मिळाली आहे. दहावीत शाळेतून तर 12वीत शहरातून प्रथम क्रमांक तिने पटकावला आहे.

जळगावातील जैन समातातील कच्ची दशा-दिशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतिलाल मोता यांची नेहा ही मुलगी आहे. भारत सरकारकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीबद्दल नेहा हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com