गोर गरिबांचे अश्रू पुसा,सेवेचे समाधान लाभेल : कैलास कडलग

रावेर येथे महसूल दिनाच्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शन
उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांचा सन्मान करतांना उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे
उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांचा सन्मान करतांना उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे

रावेर Raver|प्रतिनिधी-

नोकरी करत असतांना, सामाजिक बांधिलकी (Social commitment) जोपासणे देखील कर्तव्य आहे. लोकांच्या खिशात हात घालून महसूल (revenue) गोळा करतो. हे काम कटू असते,पण लोकांशी चांगले सबंध (good relationship) प्रस्थापित करून,सेवा दिली पाहिजे. सकारात्मक काम करा.रेशन कार्ड,संजय निराधार योजनांचा लाभ,विविध दाखले देतांना सहकार्याची भावना पाळावी. इतर विभागाला कामांसाठी निधी मिळतो, महसूल विभागाला मात्र निधी महसूल रूपाने गोळा करावा लागतो. गोर गरिबांचे (Gore wipe) अश्रू पुसले (tears of the poor) तर त्याचे समाधान आयुष्यभर असते,ज्या ठिकाणी काम करतो,त्या ठिकाणच्या लोकांनी आपले कौतुक केले पाहिजे असे मनोगत उपविभागीय अधिकारी कैलास कडलग (Sub Divisional Officer Kailas Kadalag) यांनी महसूल दिनाच्या (Revenue Day) कार्यक्रमात व्यक्त केले.

येथील तहसील कार्यालयात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला अण्णाभाऊसाठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.या प्रसंगी जिल्हास्तरावर उत्कृष्ठ मंडळाधिकारी म्हणून विठोबा पाटील,निंबोल कोतवाल अटकाळे यांना सन्मानित केले असल्याने,त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

तर रावेर तहसील विभागातील कोतवाल प्रेमसिंग पवार,तहसीलदार यांच्या गाडीवरील वाहन चालक अरविंद बोरसे,शिपाई किशोर चौधरी,पोलीस पाटील मनीषा पाटील,तलाठी दादाराव कांबळे,अव्वल कारकून शिवकुमार लोलपे,सेवानिवृत्त अव्वल कारकून सलीम तडवी,उत्कृष्ट मंडळ अधिक यासिन तडवी,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांचा देखील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी डिजिटल उतारा, मतदान कार्ड,विविध प्रकारचे दाखले,रेशन कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.याप्रसंगी तलाठी रवींद्र शिंगणे,विवरे खुर्द तलाठी भाग्यश्री बर्वे,यासिन तडवी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक दीपक गवई यांनी केले.सूत्रसंचालन जे डी बंगाळे आभार दीपक गवई यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com