चिकन कापण्याच्या सुर्‍यांसह ५० हजारांचा मुद्देमाल चोरीस

पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल
 चिकन कापण्याच्या सुर्‍यांसह ५० हजारांचा मुद्देमाल चोरीस

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील वाघळी येथे एका चिकन विक्रेत्याचे (chicken seller) दुकान फोडून (breaking shop) अज्ञात चोरट्यानी (unknown thieves) चिकन कापण्याच्या सुर्‍यांसह (chicken cutting tips) एकूण ४९ हजारांचा मुद्देमाल (item was stolen) चोरुन नेला आहे. हि घटना दि,२९ रोजी घटली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला (Chalisgaon Rural Police Station) गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी वाघळी येथील शेख रहीम शेख जोहुर मोहम्मद वय-६५ वर्षे यांचे चिकन विक्रीचे दुकान वाघळी गावातील भाबरे रोडवर आहे. पत्री शेडचे दुकान त्यांनी बंद केेले होेते. दि. २८/१०/२०२२ रोजी ९ वाजेच्या सुमारास ते दुकान भरपुर दिवसापासुन बंद असल्याने दुकान पाहण्यासाठी दुकानाकडे गेले असता ते सुव्यवस्थेत असलेबाबत खात्री करुन ते रात्री १० वाजेच्या सुमारास रात्री घरी गेले. दि. २९/१०/२०२२ रोजी संकाळी ०७.३० वाजता नेहमी प्रमाणे ते दुकानाकडे चक्कर मारण्या करीता गेले असता, दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा दरवाजा हा फाटलेला व चौडा केलेला आढळला.

संशय आल्याने शेख रहीम शेख जोहुर मोहम्मद यांनी दोन्ही मुलाना मोबाईल द्वारे फोन करुन दुकानाजवळ या आपल्या दुकानात चोरी झाल्याचे वाटत आहे असे सांगित्याने, ते सकाळी ०८.१५ वा.सुमारास दुकानाजवळ आल्यानंतर त्यांना दुकानाचे शटर उघडण्यास सांगितले. शटर उघडल्यानंतर दुकानात शिरुन पाहीले असता, दुकानात ठेवलेला सामान चोरी झालेबाबत त्यांची खात्री झाली.

आजुबाजुच्या परिसरात जावुन विचारपुस केली असता काही एक माहीती मिळाली नाही. दुकानातील सामान ३२ हजार रु.कि.चे सागवान लाकडाचे ४ दरवाजे व ४ चौकट , १० हजार रुपये किमतीचे २ ईलेक्टिक वजन काटे लहान व मोठे, ६० हजार रु.कि.चे लाकडी सोफा, १ हजार रु.कि.चे ४ चिकन कापण्यासाठी असलेले सुरे असा एकूण तब्बल ४९ हजार रुपयांची मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दि.२८/१०/२०२२ चे रात्री १०.०० वाजेपासुन ते दि.२९/१०/२०२२ रोजीचे सकाळी ०७.३० वाजेच्या दरम्यान चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com