खुशखबर..चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन आता दिवसातून चार वेळा धावणार

११ एप्रिल २०२२ पासून नव्याने दोन फेर्‍या सुरु, लवकरच प्रवाशांची गैरसोय दुर होणार
खुशखबर..चाळीसगाव-धुळे  मेमू ट्रेन आता दिवसातून चार वेळा धावणार

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

कोविड मुळे लॉकडाऊनपासून (Lockdown) गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली चाळीसगाव-धुळे पॅसेजर (Chalisgaon-Dhule Passenger) ऐवजी १३ डिसेंबर २०२१ पासून चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू ट्रेन (Memu train) सुरु करण्यात आली आहे. परंतू गेल्या चार महिन्यांपासून या ट्रेनच्या दोनच फेर्‍या (Two rounds) असल्यामुळे प्रवशांचे प्रचंड हाल होत होत. अनेक चाळीसगाव व धुळे येथील अनेक सामाजिक संघटनाकडून या ट्रेनच्या फेर्‍या वाढविण्याचे मागणी केली जात होती. त्यामुळे आता येत्या ११ एप्रिल २०२२ पासून दोन फेर्‍या सुरु करण्यात येणार असून ही ट्रेन पूर्वीप्रमाणेच दिवसातून चार वेळा (Four rounds) धावणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यासंबंधीचे अधिकृतपत्र देखील रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) काढले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दुर होणार असून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या (Chalisgaon-Dhule Memu train) प्रवासाचा सुखद अनुभव घेता येईल. ऐन लग्नसराईत रेल्वे प्रशासने योग्य निर्णय घेतल्यामुळे रेल्वेच्या उत्पनात देखील मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

असे राहिल नवीन वेळापत्रक-

चाळीसगाव येथून पहिली फेरी ६.३० वाजता, दुसरी फेरी ९.३० वाजता, तिसरी फेरी दुपारी १२.५५ वाजता, चौथी फेरी सायंकाळी ५.३० वाजत सुटणार आहे.

धुळे येथून पहिली फेरी संकाळी ७.३५ वाजता, दुसरी फेरी संकाळी ११.३० वाजता, तिसरी फेरी ३.३० वाजता, चोथी फेरी सायंकाळी ७.२० वाजता सुटणार आहे.

Related Stories

No stories found.