चांगली बातमी ; ‘एक लग्न, एक झाड’ या गावाने घेतला निर्णय

चांगली बातमी ; ‘एक लग्न, एक झाड’ या गावाने घेतला निर्णय

देवगाव, ता.पारोळा-वार्ताहर parola

सरपंच समीर पाटील यांनी नव वधू-वरांच्या हस्ते एक वडाचे झाड लावण्याची संकल्पना अंमलात आणण्याचे ठरविले. या संकल्पनेचे मानकरी वर प्रमोद व वधू सुजाता यांना नवीन जिवनात प्रदापन करताना त्याच्या हस्ते नवीन संकल्पनेचे एक लग्न एक झाड लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आर्दश लग्न समारंभ देवगाव नगरीत ‘एक लग्न एक झाड’ संकल्पनेचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांच्या उपस्थितीत करण्यात आल. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सरपंच समीर पाटील व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.

यावेळी उपस्थित मा.पं.स.सभापती डॉ.सुभाष पाटील, सरपंच समीर पाटील, उपसरपंच सुधाकर पाटील, वर पिता संभाजी पाटील, वधू पिता, प्रा.आर जी पाटील, आधार पाटील, पोलीस पाटील विश्वास शिंदे, डॉ.संभाजीराजे पाटील, जयवंत पाटील, सचिन पाटील, प्रदिप पाटील अमोल पाटील, नंदकुमार पाटील विश्वास पाटील डॉ.मनिष पाटील व वऱ्हाडी मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com