Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार

Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvana day)दिनानिमित्त प्रवाशांची (passengers) अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) 14 अनारक्षित विशेष गाड्या (Unreserved Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, 2 स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, 2 स्पेशल गाड्या धावतील. सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणार आहे.

Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
खरंच, आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत?
Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकास हेच ध्येय : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

विशेष गाड्या अशा

नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (3 फेर्‍या)-

विशेष गाडी क्र. 01262 नागपूरहून 4 रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्र.01264 ही 5 रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक 01266 ही दि. 5 रोजी नागपूरहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पोहचेल.

ही गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर स्थानकांवर थांबेल.

Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
VISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं
Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
...आणि आजीमाजी मंत्र्यांसह 18 उमेदवारांचा जीव पडला भांड्यात

विशेष गाडी क्र. 01262 ला 16 सामान्य द्वितीय श्रेणी. विशेष गाडी क्र. 01264 आणि 01266 ला 12 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

मुंबई/दादर ते सेवाग्राम,अजनी,नागपूर अनारक्षित विशेष- विशेष गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6 रोजी दुपारी 4.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता अजनी पोहोचेल.

विशेष गाडी क्र. 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6 रोजी सायं. 6.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्र. 01253 दादर 7 रोजी पहाटे 12.40 वाजता (6/7 डिसेंबर रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनी पोहोचेल. विशेष गाडी क्र. 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 रोजी दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 3 वाजता नागपूर पोहोचेल.

Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

विशेष गाडी क्र. 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 8 रोजी सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12.10 वाजता नागपूर पोहोचेल.

विशेष गाडी क्र. 01259 दादर 8 रोजी (7/8रोजीच्या मध्यरात्री) 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनी पोहोचेल.

ही गाडी दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी. विशेष गाडी क्र. 01249, 01255, 01257 आणि 01259 यांना 16 सामान्य द्वितीय श्रेणी.तर गाडी क्र. 01251 आणि 01253 मध्ये 12 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....

कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष - विशेष गाडी क्र. 01245 कलबुर्गी दि. 5 रोजी सायं. 6.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्र. 01246 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 रोजी (6/7 रोजी मध्यरात्री) 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.

ही गाडी गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर स्थानकांवर थांबेल. या गाडीला 7 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष - विशेष गाडी क्र. 01247 ही 5 रोजी रात्री 11.20 वाजता सोलापूरहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पोहोचेल.

गाडी क्र. 01248 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 रोजी पहाटे 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता सोलापूर पोहोचेल. ही गाडी कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर स्थानकांवर थांबेल. या गाडीला 10 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष - सुपरफास्ट स्पेशल गाडी क्र. 02040 अजनी येथून 7 रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.स्थानकांवर थांबेल या गाडीला 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

मध्य रेल्वेने 6 रोजी सुरु होणारी गाडी क्र. 11401 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद एक्सप्रेस प्रवास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, दक्षिण मध्य रेल्वे आदिलाबाद-मुंबई विशेष ट्रेन चालवणार आहे ज्याची सूचना योग्य वेळी केली जाईल.

सर्व संबंधितांनी कृपया या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि त्यांचा प्रवास सुखकर करावा. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com