मुक्ताईनगर तालुक्यात भाजपा व शिंदे गटाला दे धक्का

कुऱ्हा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा सरपंच तर उचंदा ग्रामपंचायतवर अपक्षाची वर्णी
मुक्ताईनगर तालुक्यात भाजपा व शिंदे गटाला दे धक्का

मुक्ताईनगर  Muktainagar

तालुक्यातील उचंदा आणि कुऱ्हा अशा दोन ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक (Gram Panchayat Elections) निवडणुका पार पडून आज मतमोजणीचा निकाल (result) जाहीर झाला.त्यात  भाजपा व शिंदे गटाला मोठा धक्का देत आमदार खडसे समर्थकांनी बाजी मारली आहे.

कुऱ्हा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचे सरपंच तर उचंदा ग्रामपंचायत वर सरपंचपदी अपक्ष उमेदवाराची वर्णी लागली आहे.ग्रामपंचायत उचंदे ग्रा.प. निवडणूक ही 11 जागेसाठी झाली त्या निवडणुकीत विजयी उमेदवार असे.सरपंचपदी वंदना दीपक भोलाणे सदस्य- प्रभाग १   सविता विकास धनके यांची निवड झाली होती. सुनील सखाराम पंचफुला सोपान बेलदार प्रभाग -२ हिवरे वसंताबाई सीताराम,पाटील गणेश मधुकर,पाटील वैशाली विनोदप्रभाग- ३ प्रकाश काशिनाथ पाटील, शोभा कैलास भोलाणे यांची बिनविरोध निवड झाली होती.

प्रभाग-४ तायडे किरण कुताजी, इंगळे प्रतिज्ञा राहुल,इंगळे सविता भागवत# कुऱ्हा ग्रामपंचायत निवडणूक ही 17 जागांसाठी झाली त्यामध्ये विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.सरपंच - बळीराम चांगो पाटील (महाजन) सदस्य - प्रभाग १- कादिरशा खुदूशा फकीर ,  शेख शबाना बी शेख इरफान.प्रभाग-२ इंगळे शांताराम बळीराम, अनिता सत्तेशवर नागरे ,फकीर हाजराबी अब्दुला शा.प्रभाग -३ श्रीनाथ द्वारका संतोष, खिरळकर संध्या गजाननप्रभाग -४ सोनवणे विनोद मधुकर,कवळे गजानन वासुदेव,पूजा अविनाश वाढेप्रभाग-५ पाटील गजानन शंकर,काकडे ज्योती अरुण, रंजना रमेश माहुरकरप्रभाग -६ बडूगे प्रभुसिंग शिवसिंग,गौतम रवींद्रसिंग डिगंबरसिंग,सुषमा जनार्दन मदाने.

मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा आणि उचंदा अशा दोन ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी शांततेत पार पडले.या कामी महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडले. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाला मतदारांनी चांगलाच धक्का दिला आहे, तर आमदार एकनाथराव खडसे समर्थकांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com