निर्णय बदलला : गिरणा धरणातून सोडण्यात येणारे आर्वतन लांबणीवर

आर्वतन एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले-अभियंता हेमंत पाटील
गिरणा धरण
गिरणा धरण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कडक उन्हामुळे जिल्ह्यातील गिरणाधरणावर अवलंबून असणार्‍या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे (Collector) जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता, (girna Irrigation Department) गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशान्वये, उद्या दि.२४/४/२०२२ रोजी संकाळी ६ वाजता गिरना धरणातून पिण्याच्या पाण्याचे चौथे आर्वतन सोडण्यात येणार होते. परंतू काही अपरिहार्य कारणामुळे गिरणा धरणातून दि,२४ रोजी सोडण्यात येणार आर्वतन एक आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

आर्वतन सोडण्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती (Irrigation Department) पाटबंधारे विभागचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आर्वतनासाठी आता पुन्हा आठवडाभरासाठी ग्रामस्थांना वाट पाहवी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com