
बोदवड - प्रतिनिधी Bodwad
शेलवड (Shelvad) येथील विद्यार्थीनी (Student) तृप्ती भगवान चौधरी (वय १७) अकरावीची विद्यार्थीनी न.ह.राका. हायस्कूल येथे शिक्षण घेत होती. दरम्यान दि.२४ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान शाळेतून घरी परतत असतांना बोदवड वरुन शेलवडकडे घरी जात असताना वैष्णवी जिनीग जवळ हात सटकुन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.
तृप्ती ही वडीलांना एकुलती एक मुलगी असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (s.t.bus) एस.टी.बस सेवा बंद असल्याने तालुक्यातील विद्यार्थी याचे खुप हाल होत असून बस सेवा लवकर सुरु व्हावी अशी मागणी होत आहे.