पहिलीला न सोडता दुसरीसोबत घरोबा, अक्षताऐवजी हातात पडली बेडी

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo

रावेर raver प्रतिनिधी

येथे महाराजा मंगल कार्यालयात लालबाग येथील तरुणाचा विवाह ( Young man's marriage) रमजीपुर (ता.रावेर) येथिल युवतीशी (young woman) दि.१२ रोजी दुपारी होणार होता, बँड बाजा बाराती घेवुन मंडपात पोहचलेला नवरदेवांवर अक्षता पडण्याआधीच (Even before Akshata falls)पहील्या पत्नीने (first wife)आमचे लग्न झाले असल्याचा दावा (Claim to be married)केल्याने, मंडपात गोंधळ उडाला.या घटनेत वेळीच पोलीस पोहचल्याने, दुसर लग्न करू पाहणाऱ्या नवरोबाला पोलीस (Police) ठाण्यात आणल्यावर त्याचे लग्न झाल्याचे कबुल केल्याने, आज होणारा विवाह थांबवण्यात आला. 

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

     लालबाग येथिल वैभव महाजन बी.ई. झालेला तरुण याने दुसऱ्या समाजातील मुली सोबत लव्ह अँड रिलेशशिपमध्ये राहून नुकतेच दि.१० एप्रिल रोजी पुण्यात देहू येथील अलंकापुरी येथे लग्न लावुन घेतले होते. त्या मुलीला घरी ठेवुन दुसर लग्न करण्यासाठी निघालेल्या या नवरदेवाला अक्षता पडण्याआधी,पहीले लग्न केलेल्या मुलीने थेट मंडपात जाऊन हा विवाह रोखल्याने, नवरदेवाची चांगलीच पंचाईत झाली.

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ
Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
breaking # अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी

वाद होण्याआधी पोलीस या ठिकाणी पोहचल्याने नवरदेव व त्याची पुण्याहून आलेली पत्नी यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर नवरदेव वैभव याने लग्न केले असल्याचे कबुल केले. यावेळी समाजातील मंडळीने हस्तक्षेप करून आज होणारा विवाह रोखण्याचा निर्णय घेतला.

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
जिल्ह्यात उष्णतेची लाट; पारा 44.9 अंशावर
Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले

तर वैभव आपल्या घरी लालबाग आला असता, आईची तब्ब्येत खराब असल्याने, तिला मानसिक त्रास होईल,या विवाह बद्दल घरात कुणालाही काही एक न सांगता समाजातील मुलीशी करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहीती त्याने पोलीसांना दिली आहे.

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?
Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
वीजचोरी करणार्‍या 88 प्रकरणांचे पोलिसांत गुन्हे दाखल

पहीली पत्नी वैभवशी बोलत , तो दुसर लग्न करणार नाही अस सांगत होता.मात्र दोन दिवसापासून त्यांने मोबाईल बंद केल्याने,त्यांच्या पत्नीने थेट लग्न स्थळ गाठले, काही क्षणात अक्षता पडतील त्या आधीच तिने हा गौप्यस्फोट केल्याने, मंडपात गोंधळ उडाला. 

Indian Wedding Ceremony, Indian Marriage Photo
photo# लोणी येथून विवाहिता तीन मुलांसह बेपत्ता
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com