भाडे मागितल्याचा राग येवून मालकाच्या डोक्यात घातला दगड

सुप्रिम कॉलनीतील घटना; पोलिसात गुन्हा दाखल
भाडे मागितल्याचा राग येवून 
मालकाच्या डोक्यात घातला दगड

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

घरभाडे मागितल्याचा राग (Anger of asking rent) आल्याने भाडेकरुने (Tenants of landlords) घरामालकाच्या डोक्यात ( head ) दगड मारुन दुखापत (Stone injury) केल्याची घटना बुधवारी सुप्रिम कॉलनीत घडली. याप्रकणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील सेवालाल चौकात संजय रघुनाथ कोळी (वय-45) हे वास्तव्यास आहेत. याच परिसरात असलेले घर त्यांनी गुणवंत विठोबा कोळी यास भाडेकरारावर दिले आहेत. बुधवारी सायंकाळी संजय रघुनाथ कोळी यांनी दोन महिन्यांचे घरभाडे बाकी असून ते घरभाडे द्यावे असे गुणवंत कोळी यास सांगितले.

घरभाडे मागितल्याचा राग आल्याने गुणवंत कोळी याने दारुच्या नशेत शिवगाळ तसेच दमदाटी करत संजय कोळी यांच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. या मारहाणीत संजय कोळी हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुणवंत कोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com