
पारोळा - प्रतिनिधी Parola
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे कपाशी, ज्वारी, बाजरी, मका व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पारोळा तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाला असून पिके वादळामुळे आडवी पडली शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला म्हणून या नुकसानीचे त्वरित पंचनामे झाले पाहिजे अशी मागणी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन केली.
यावर कृषी मंत्री दादा भुसे यांना याबाबत सूचना दिल्या आहेत कृषी विभागाकडून जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश काढले जातील असे आश्वासन अजित पवार यांनी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांना दिले आहे 22 रोजी तालुक्यात 65 पॉईंट 6 मी एवढ्या पावसाची नोंद झाली अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली अनेक जणांची पिके वादळामुळे आडवी पडली शेतात अति पाणी शिरल्याने पिके सडू लागली आहे.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे नुकसान भरपाईसाठी शेती पिकाच्या नुकसानीचा पंचनामा हा लागतो पण दोन दिवस उलटून देखील जिल्हाधिकारी यांनी प्रांत व तहसीलदार यांना पंचनामा करण्याचे आदेश दिलेले नाहीत यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना या संकटातून वाचविण्यासाठी हे पंचनाम्याचे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.