नदीपात्रातील अतिक्रमणाच्या मुद्दावर गाजली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा

चाळीसगाव : महाराणा प्रतापसिंग यांचा पुतळा बसविण्याच्या ठरावास मंजुरी, शहरातील तीन पुलांची तातडीने होणार दुरुस्ती
नदीपात्रातील अतिक्रमणाच्या मुद्दावर गाजली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील गेल्या महिनाभरात अतिवृष्टीमुळे सहा महापुर येवून गेेलेत, नदीपात्रातील अतिक्रमण न काढल्याने, खोलीकरण व स्वच्छता न केल्यामुळे पुराचे पाणी शहरात मोेठ्या प्राणात घुसल्याचा मुद्दयावरुन शहवि आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाच्या नगराध्यक्षासह सदस्यांवर प्रश्‍नांची सरबती केली.

त्यामुळे नगरपरिषदेचीतर्फे आज आयोजित ऑनलाईन विशेष सर्वसाधरण सभा नदीपात्रातील अतिक्रमणावर चांगलीच गाजवली. या सभेत शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंग यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंबंधीच्या ठरावासह, शहरातील तीन पुलाची तातडीने दुरुस्ती व बेघरांसाठी तात्पूर्ता निवरासंबंधीच्या विषयांना सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली सर्व साधरण सभेसाठी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह जवळपास सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.