
जळगाव jalgaon
जगप्रसिद्ध न्यूयॉर्क फॅशन वीक (Newark Fashion Week) 2023 मध्ये जळगावच्या आय एन आय एफ डी, (INIFD,) संगीता अकॅडमी इन्स्टिट्यूट (Sangeeta Academy Institute) मधील फॅशन डिझायनिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींची (students) निवड (selection)करण्यात आली आहे. फॅशन डिझाईनचे विद्यार्थी स्वदेशी खादी कापड (khadi fabric designs) व भारतीय कला याचा वापर करून वेगवेगळ्या गारमेंट (Garments) डिझाइन्स न्यूूयॉर्क फॅशन शोमध्ये सादर करणार आहे.
सन 1943 पासून न्यूयॉर्क फॅशन वीकचे आयोजन करण्यात येत आहे. हा शो दरवर्षी फेब्रुवारी आणि सप्टेंबर मध्ये आयोजित करण्यात येतो. देश - विदेशातील विद्यार्थी या शोमध्ये सहभाग घेतात न्युयॉर्क फॅशन वीक हा 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे
या शोसाठी कोयल कोळी ,रुणाली पाटील, अनम खान , स्नेहल ब्राहमनकर, केशर जोशी ,पूनम बोरसे, इशा पाटील,अनुषा मान्सूरी, मानसी महाजन, रोहिणी परित या दहा विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
या शोसाठी विद्यार्थी स्वदेशी खादी यावर काम करीत आहेत. "फॅशननाझिंग फॅब्रिक्स- खादी" या थिम नुसार रिसर्च करून , डिझाईन प्रोसेस ,फॅब्रिक क्राफ्टस , कलर्स स्टडी पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग, प्रोटोटाईप, गारमेंट कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या प्रक्रियेतून काम करीत आहेत
यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या संचालिका संगीता पाटील, फॅशन डिझायनिंग फॅकल्टी लंडन फॅशन स्कूल च्या फॅकल्टी जिंटारे जानक्यूनी ,अजय परमार यांचे मार्गदर्शन मिळत आहे.