धूमस्टाईलने मोबाईल लांबविणारीे टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई
धूमस्टाईलने मोबाईल लांबविणारीे टोळी गजाआड

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

धुमस्टाईलने मोबाईल लांबविणार्‍यांसह जबरी चोरी करणार्‍या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्या टोळीला रामानंद पोलीस ठाण्याकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

पायी जाणार्‍या व्यक्तीच्या हातातून मागून भरधाव धुमस्टाईलने येवून मोबाईल लाबविणारे संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप साबळे, विजय पाटील, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, सचिन महाजन, किरण धनगर यांचे पथक तयार करुन रवाना केले होते.

यापथकाने जबरी चोरी करणारे विशाल दिनकर सपकाळ (वय-23, रा. शास्त्रीनगर,जामनेर), आकाश कडू आल्हाट (वय-22, शिवाजीनगर, जामनेर) यांच्यासह त्यांचा साथीदार योगेश सोनार रा. जामनेर या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी रामानंद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com