डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जळगाव jalgoan । प्रतिनिधी

बाहेरगावी राहणार्‍या जागा मालकांना हेरुन त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करीत त्यांच्या जागी बनावट व्यक्ती (dummy owners) उभी करुन कमी पैसे घेवून जागा खरेदी (selling plots) करुन देणार्‍या टोळीचा (Gangs) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
दोनशे रुपयांची लाच, सहाय्यक अधीक्षक गजाआड
डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
जवळ बाळगला देशी कट्टा एलसीबीने ठोकल्या बेड्या

शहरातील अयोध्या नगरात बखळ तीन प्लॉट अनिल राजेंद्र नेहते यांच्या नावावर असून त्या सध्या कामानिमित्त नाशिक येथे राहतात. त्यांचा सुमारे 2 कोटी रुपयांचे प्लॉट राजू जगदेव बोबडे, प्रमोद वसंत पाटील व गंगा नारायण जाधव हे तिघे कमी पैसे घेवून ज्या व्यक्तीच्या नावावर प्लॉट आहे. त्यांचे बनावट बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड तयार करुन विक्री करीत कमी पैशांमध्ये प्लॉटची बनावट खरेदी करुन देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
सराईत गुन्हेगाराचा व्यापार्‍यासह तरूणावर प्राणघातक हल्ला

त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. हे तिघ संशयित ऑटो नगरातील हॉटेल संदीप जवळ असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेवून संशयित राजू जगदेव बोबडे (वय-42, रा. विठ्ठल रुख्माई मंदिर विटनेर), प्रमोद वसंत पाटील (वय-46, रा. विरावली ता. यावल) व महिला गंगा नारायण जाधव (वय-42, रा. अयोध्या नगर) या तिघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले. यातील राजू बोबडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, रामानंदनगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
अरेच्च्या ...नंदुरबार जि.प. त पात्रता नसलेल्या अधिकार्‍यांना पदभार ?
डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
विद्यापीठ विकास मंचचा अधिसभेवर झेंडा

बाहेरगावी स्थायिक झालेल्यांच्या प्रॉपर्टींवर होता डोळा

कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या लोकांच्या नावावरील प्रॉपर्टी बघून त्या कोणाच्या नावावर आहेत. याबाबतची माहिती राजू बोबडे व प्रमेद पाटील हे गोळा करीत होते. त्यानंतर त्यांच्या जागी बनावट मालक तयार करुन त्यांच्या मूळ मालकाचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्या कमी पैशांमध्ये विक्री करणे हा त्यांचा धंदा असल्याने अशा प्रॉपर्टींवर त्यांचा डोळा होता.

डमी मालक उभे करुन प्लॉट विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला

2 कोटींचा प्लॉट खरेदीपुर्वीच केला भांडाफोड

नाशिक येथे स्थायिक झालेल्या अनिता नेहते यांच्या नावावर अयोध्या नगरात 2 कोटी रुपयांचे तीन प्लॉट होते. त्यांनी त्यांचे बनावट कागदपत्र तयार करुन त्यांच्या जागी गंगा जाधव ही बनावट महिला उभी करुन त्यांचा प्लॉट खरेदी करुन देणार होते. परंतु त्यापुर्वीच एलसीबीच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केला भांडाफोड

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, अभिलाषा मनोरे, विजय पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com