एटीएम कार्ड बदलून पैसे काढणारी टोळी जेरबंद

94 एटीएम कार्ड कार्डसह साडेचार, लाखांचा मुद्देमाल जप्त, शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी
एटीएम कार्ड बदलून पैसे काढणारी टोळी जेरबंद

धुळे -प्रतिनिधी dhule

एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या चारही आरोपींवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत पोलिसांच्या कामगिरीची कौतुक केले. यावेळी एका आरोपीने फसवणुकिची पद्धतही सांगितली.

मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची खात्रीशिर माहिती काल दि.२६ रोजी सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद गावाकडे जावून संशयीत इसम व वाहनाचा शोध सुरु केला. साखर कारखान्याजवळ एम एच ०२ बी झेड ३४३९ गाडी व त्यात चार जण मिळून आले. त्यांना त्यांचे नांव गाव विचारून त्यांचेकडे चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागले. पोलीसी हिसका दाखवितात त्यांनी त्यांची नावे सांगीतले. आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यावरुन त्यांची व वाहनाची तपासणी केली असता गाडीत 94 एटीएम कार्ड मिळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी अन्साराम आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ पोसई भिकाजी पाटील, पोसई संदिप पाटील पोकॉ पाटील, पोकॉ संतोष पाटील, जयेश मोरे, पोकॉ इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील पोकॉ.प्रशांत देशमुख,पोना देवेंद्र वेधे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com