उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद

चार पिस्तुलांसह दहा काडतूस हस्तगत
उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उमर्टीकडून (Umarti) चारचाकीमध्ये गावठी पिस्तूल (village pistol) घेवून जाणार्‍या आंतरजिल्हा टोळीच्या (inter-district gangs) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch team) चोपडा येथून मुसक्या आवळल्या (Smiles spread.). राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय-32, मूळ रा. खंडाळा, ह. मु. वार्ड क्र. 3 श्रीरामपुर जि. अहमदनगर) व गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय-23, रा. शिरसगाव, जि. अहमदनगर) या दोघांकडून चार पिस्तूल (Four pistols)व दहा काडतूस (Ten cartridges seized)जप्त करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील उमर्टी येथे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेण्यासाठी (एमएच 15 डीएम 7778) क्रमांकाची कार तिच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे लिहिलेली पांढर्‍या रंगाची कार गेली असून ती पिस्तूल घेवून चोपडामार्गे अहमदनगर येथे जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.

दरम्यान, उमर्टी येथून संशयित चोपड्यातील शिवाजी चौकात येणार असल्याने पोलिसांनी रस्त्यात सापळा रचला. ती कार चोपड्याकडे येतांना दिसताच पथकाने कारला चारही बाजूंनी घेरले आणि त्यातील दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली.

उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

पायदानाखालून मिळाल्या पिस्तूल

पथकातील कर्मचर्‍यांनी कारची झडती घेतली असता, त्यांना कारच्या पायदानाखालून 4 गावठी पिस्तूल तर राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण व गणेश सातपुते या दोन्ही संशयितांच्या खिशातून प्रत्येकी पाच जिवंत काडतूस, तीन मोबाईल व कार जप्त करण्यात आले.

या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, पोलीस उपअधक्षक ऋषीकेश राऊले, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, सुनिल दामोदरे, महेश महाजन, रविंद्र पाटील, परेश महाजन, दीपककुमार शिंदे, मुरलीधर बारी यांच्या पथकाने कामगिरी केली.

उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद
नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

संशयित नगरमधील सराईत गुन्हेगार

पोलिसांनी कारवाईत पकडलेला राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय-32, मूळ रा. खंडाळा, ह. मु. वार्ड क्र. 3 श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हा संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com