यावल शहर व ग्रामीण क्षेत्रात गणेश विसर्जन शांततेत

शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
यावल शहर व ग्रामीण क्षेत्रात गणेश विसर्जन शांततेत

यावल Yaval ( प्रतिनिधी )

येथील शहरातील (city) २० तर यावल पोलीस ठाण्याच्या परीसरातील ग्रामीण भागातील (rural areas) १५ अशा ३५ अशा पाचदिवशिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (Public Ganeshotsav Mandal) विसर्जन मिरवणुकीस (Immersion Procession) आज पारंपरिक वाद्य-वृंदाच्या गजरात (sound of a traditional band) रविवारी सायंकाळ पासून सुरवात झाली आहे. या वर्षी कोरोना संसर्ग हद्दपार झाल्याने श्रीगणेशाच्या उत्सवावर कोणतेही प्रशासकीय बंधणे नसल्याने युवा वर्गात प्रचंड उत्साह आहे.

शहरात पाच दिवशिय गणेशोेत्सवाची परंपरा आहे. यावल शहरात २० सार्वजनिक तर एक खाजगी असे २१ गणेश मंडळानी श्रीची पाच दिवशीय स्थापना केलेली होती. या सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरणुकीस रविवारी सायंकाळी ढोल-तासे, यासह विविध वाद्य-वृंदाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. काही मंडळांनी मिरवणुकीत सहभागी न होता परस्पर विसर्जन केले.

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे परीक्षाविधीन उपाधीक्षक दिपक बैसाणे येथील पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी बंदोबस्त चोख राखला.

यावल शहरातील श्रीची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत शांततेत सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. शांतता समिती सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

यावल शहराला आले पोलीस छावणीचे स्वरूप
मिरवणुकीसाठी बंदोबस्तासाठी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी - २ , पोलिस निरिक्षक - २ , सहाय्यक पोलिस निरिक्षक - १ , पोलिस उपनिरिक्षक -१२, पोलिस कर्मचारी - १०० , होमगार्ड - ८० , दंगा नियंत्रण पथक - १ , स्ट्रेकिंग फोर्स​ - २ , राज्य राखीव पोलीस दल - १ असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शहरात जागोजागी पोलीस दिसत असल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
ग्रामीण भागातील 15 सार्वजनिक मंडळाची विसर्जन शहराव्यतीरीक्त येथील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील नायगाव (१),कोरपावली (४) , डांभुर्णी (६), दहीगाव (३), सावखेडासीम (१) अशा १५ श्री मंडळाचे विसर्जन करण्यत आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com