गडकरी साहेब,घोषणा दररोज 30 किमीची मग, दोन किमी साठी सात ते आठ महिने का?

अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुलीपर्यंतचे काम संथगतीने
गडकरी साहेब,घोषणा दररोज 30 किमीची मग, 
दोन किमी साठी सात ते आठ महिने का?

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

दळण-वळणाची सुविधा सुलभ व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highways) चौपदरीकरणाचे (Four-laning) काम युध्द पातळीवर सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणतात की, देशात दररोज 30 किमी चे रोड तयार केले जातात. मग, जळगावातील अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुलीपर्यंत (Ajanta Chowfuli to Raymond Chowfuli) सुरु असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सात ते आठ महिने होवूनही पूर्ण का होवू शकत नाही? असा संतप्त सवाल औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून (Entrepreneur) व्यक्त होत आहे. दरम्यान, चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर करावे अशी अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात सुरत-अमरावती, जळगाव-औरंगाबाद, अंकलेश्वर या महामार्गांचे चौपदरीकरणाचे (Four-laning) काम सुरु आहे. यात तरसोद ते चिखली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र, तरसोद ते फागणे या रस्त्याचे काम अवघे 60 टक्के झाले असून, भूसंपादनाच्या (Land acquisition) वाढीव मोबदल्यामुळे हे काम रखडले आहे. तसेच मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा जळगाव-औरंगाबाद (Jalgaon-Aurangabad) या महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम सुरु आहे. यात अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुली (Ajanta Chowfuli to Raymond Chowfuli)या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरु झाले असुनही अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणतात की, देशात दररोज 30 किलोमीटरचे रस्ते तयार केले जातात. मग, जळगावातील अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुलीपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाला विलंब (Work delay) का होतोय? असा सवालदेखील उपस्थित होत आहे.

धुळीमुळे आरोग्य धोक्यात

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अजिंठा चौफुली पासून महामार्ग चौपदरीकणाचे काम सुरु आहे. एमआयडीसी परिसरात जवळपास छोटे-मोठे दोन हजार उद्योग असून, सुमारे 25 ते 30 हजारांपेक्षा अधिक कामगार या मार्गाने ये-जा करतात. चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामामुळे आणि धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात (Dust threatens citizens' health) येत आहे. अक्षरशः या मार्गावरुन दररोज जाणे-येणे करणार्‍या नागरिकांना धुळीमुळे डोळ्यांचा त्रास जाणवत आहे. तसेच धुलीकरण फुफ्फुसात जावून न्युमोनिया, श्वासनश्वासाचे, खराब रस्त्यांमुळे मणक्याचे आजार बळावत आहे. रस्त्यावरुन चालणारा प्रत्येक दुचाकीधारक हा यंत्रणेच्या नावाने अक्षरशः बोटे मोडत आहे.

अपघातासह वाहतुकीची कोंडी

अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुलीपर्यंतचे रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. सात-आठ महिने होवूनही अद्यापपर्यंत काम होवू शकले नाही. या रस्त्यावर दररोज अपघात (accident) होत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच एकेरी मार्गानेच वाहतूक होत असल्याने वाहतुकीचीही कोंडी होत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, ही कामे लवकर होणे अपेक्षीत आहे. अजिंठा चौफुली ते रेमण्ड चौफुली केवळ दोन किलोमीटरचे अंतर आहे. हे काम गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरु असूनही अद्यापर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उद्योजक, कामगार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे.

भुवनेश्वर सिंह, अध्यक्ष, जिंदा असोसिएशन

अजिंठा चौफुलीपासून ते रेमण्ड चौफुलीपर्यंतचे महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. अपूर्ण कामामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. तसेच या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या नागरिकांना धुळीमुळे आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवत असल्याच्या तक्रारी आहेत. महामार्गाचे काम नियोजन करुन लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे.

रवींद्र फालक अध्यक्ष, लघू भारती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com