गडकरी, राणे, डॉ. पवार, पाटील, दानवे, देशमुख फडणवीस आज जामनेरात

आ. गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नसमारंभाला देणार उपस्थिती
News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भाजपाचे माजी मंत्री (Former BJP Minister) आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांची कन्या श्रेया (Kanya Shreya) हिच्या विवाहसोहळ्यानिमित्ताने भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांची (Union Ministers) फौज उद्या दि. 20 रोजी जामनेर दौर्‍यावर येत आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सायंकाळी जामनेरात दाखल होणार आहेत.

भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची कन्या श्रेया हिचा उद्या दि. 20 रोजी विवाहसोहळा (Wedding ceremonies) जामनेर येथे आहे.

त्यानिमित्ताने भाजपाचे हेवीवेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचे उद्या 20 रोजी दुपारी 3.30 वा. जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 4.15 वा. हिवरखेडा येथे विवाह समारंभास ते उपस्थिती देणार असुन सायंकाळी 6 वा. जळगाव विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांबाबत ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6.30 नागपूरकडे ते प्रयाण करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे 20 रोजी सकाळी 10.45 वा. जामनेर येथे आगमन होणार असुन विवाहसमारंभाला उपस्थिती दिल्यानंतर दुपारी 1.15 वा. ते मुंबईकडे प्रयाण करतील.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State Dr. Bharti Pawar) ह्या दुपारी 12 वा. जामनेरात दाखल होणार आहेत. तर मंत्री कपील पाटील हे सायंकाळी 7.40 वा. जामनेर येथे पोहोचतील. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखिल उद्या 20 रोजी दुपारी 4.45 वा. जळगाव विमानतळावर आगमन होणार असुन सायंकाळी 6 वा. आ. गिरीश महाजन यांचे निवासस्थानी ते येतील.

त्यानंतर विवाहसमारंभास उपस्थिती देणार असुन रात्री 9.30 वा. ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. तसेच राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh) हे देखील उद्या 20 रोजी सकाळी 11 वाजता जामनेर येथे येणार आहेत. दुपारी 12.45 वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जागा पाहणी व दुपारी 1.15 वाजता जळगाव शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे आढावा बैठक घेणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State Raosaheb Danve) हे देखील सायंकाळी 6.30 वाजता जामनेर येथे आमदार महाजन यांच्या कन्येच्या विवाह समारंभाला उपस्थिती देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com