कडक पोलीस बंदोबस्तात धडकनवर अंत्यसंस्कार

संशयीताला 3 दिवसाची पोलीस कोठडी; दोघे संशयित फरार
कडक पोलीस बंदोबस्तात धडकनवर अंत्यसंस्कार

जळगाव । प्रतिनिधी

जून्या वादातून आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय-30, रा. कोळीपेठ) या तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. सकाळी आकाशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरातील जूने बस स्थानकाशेजारी आकाश उर्फ धडकन हा त्याचा भाऊ सागर व त्याचे मित्र विशाल हरदे, शुभम इंगळे, केशव इंगळे, सनी साळुंखे यांच्यासोबत अंडापाव खात असतांना गोपाल उर्फ आण्णा हा नर्‍या उर्फ भद्रा व विजू यांच्यासोबत त्याठिकाणी आला. सागर आनंदा सपकाळे व गोपाल सैंदाणे यांच्यात जूना वाद असल्याने गोपालने सागरला तुमच्यासोबत का ठेवता असे म्हणत वाद घालू लागला.

यावेळी आकाश सपकाळे हा त्याला समजवित असतांना गोपालने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढून आकाशसह त्याच्या साथीदारांवर वार केले. यामध्ये आकाशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघ गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी गोपाल उर्फ आण्णा कैलास कैेलास सैंदाणे, नर्‍या उर्फ भद्रा व वीजू यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहे.

अधिकारी रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून

खूनाची घटना घडल्यानतर संशयित गोपाल सैंदाणे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com