राज्य उत्पादन शुल्कच्या इमारतीसाठी निधी मंजूर

राज्य उत्पादन शुल्कच्या इमारतीसाठी निधी मंजूर

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश असलेल्या राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या मालकीच्या जागेत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा जि. जळगाव या कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 58 लाख 90 हजारांचा निधी मंजूर करुन त्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यासंदर्भात राज्य शासनातर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विभागाचे अवर सचिव सं. गो. ढाकणे यांनी दिलेल्या आदेशाची प्रत चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.लता सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना नुकतेच प्राप्त झाले. यासंदर्भात पाठविलेला प्रस्ताव व त्या अनुषंगाने चोपड्याच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे (MLA Latatai Chandrakant Sonwane) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com