शेतकर्‍याला लुटणारा फरार आरोपी गजाआड

शेतकर्‍याला लुटणारा फरार आरोपी गजाआड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेतकर्‍याला (farmer) लुटून (robbing) दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित (Fugitive accused) शाहरुख रज्जाक तडवी (वय-25, रा. कोल्हे ता. पाचोरा) हा पोलिसांना गुंगारा देत होता. तब्बल दोन वर्षानंतर त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या

पाचोरा येथील शाहरुख रज्जाक तडवी याने शेतकर्‍याची घटना घडली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून शाहरुख हा पोलिसांना गुंगारा देत अटक चुकवित होता. दरम्यान, संशयित शाहरुख हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गावात आल्याची कुणकुण लागताच संशयित शाहरुख हा पळून जात असतांना त्याच्या पथकाने चारही बाजूने घेरून मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com