खडसे कुटूंबियांकडून जीवाला धोका!

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन
खडसे कुटूंबियांकडून जीवाला धोका!
Breaking news Breaking news

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) व त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका आहे, (Danger to life) माझे कुटुंब असुरक्षित आहे, असा धक्कादायक आरोप (Allegations) शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याबाबत आमदार चंदक्रांत पाटील (Shiv Sena's Muktainagar MLA Chandrakant Patil) यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांना निवेदन दिले आहे.

मुक्ताईनगर येथे काल रात्री वाद होऊन परस्परविरोधात गुन्हे दाखल आहे. रोहिणी खडसे खेवलकर यांनी महिलांवर जर अशाच पध्दतीने अन्याय होत राहिला तर वेळप्रसंगी आमदाराला चोप देवु असे विधान केले आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे परिवाराकडून जीवाला धोका असून त्याबाबतचे जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. खडसे परिवाराकडून यापूर्वीही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे तसेच हल्ले झाल्याचा प्रकार घडला आहे.

आता रोहिणी खडसेंनी थेट चोप देण्याची भाषा केल्याने माझ्या जिवाला धोका असून याबाबत पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्या आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍याकडून पारदर्शकपध्दतीने चौकशी व्हावी अशी विनंतीही पोलीस अधीक्षकांना केली असल्याचे आ. पाटील म्हणाले आहे.

जिल्ह्यातील महाविकास

आघाडीत बिघाडी

आता रोहिणी खडसेंच्या आमदाराला चोप देण्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस हे पक्ष सत्तेत सहभागी आहेत. सत्तेतील दोन्ही पक्षांमध्ये वाद पेटल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसेंमुळेच शिवसेना भाजपची युती तुटली होती आता महाविकास आघाडी तुटू नये अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

असा पेटला वाद

राष्ट्रवादी काँग्रेसने मुक्ताईनगरात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे अवैधधंदे असल्याचा आरोप करत ते बंद करावे असे निवेदन पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले होते. यादरम्यान बोदवड नगरपंचायतीत रोहीणी खडसे यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला होता. यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत असा कुठलाही प्रकार नसल्याचे उत्तर दिले होते. तसेच शिवसेना अवैधधंद्यांच्या विरोधात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकार्‍यांचे अवैधधंदे असल्याचा आरोप केला होता. अशाप्रकारे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com