सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ. चिंचोलकरांनी दिल्यात भविष्यातील पत्रकारीतेबाबतच्या टिप्स

उमविच्या पत्रकारीता विभागातर्फे ऑनलाईन व्याख्यान
सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ. चिंचोलकरांनी दिल्यात भविष्यातील पत्रकारीतेबाबतच्या टिप्स

जळगाव,jalgaon प्रतिनिधी

प्रगल्भ बुध्दीमत्ता, (Profound intelligence) तीव्र स्मरणशक्ती आणि नवनवीन भाषा व विषय शिकण्याची तयारी (Ready to learn) यामुळे बाळशास्त्री जांभेकरांनी (Balshastri Jambhekar) पारतंत्र्यातही आपली छाप इंग्रजांवरच नव्हे तर भारतीयांवर देखील पाडली होती. त्यांनी तरुण वयातच मराठी भाषेच्या (Marathi languages) सवंर्धनासाठी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे विद्याथ्र्यांनी बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन पत्रकारितेत (journalism) भविष्यात वाटचाल करावी असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur University) जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र चिंचोलकर (Prof. Dr. Ravindra Chincholkar) यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (North Maharashtra University) जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांच्या २० फेब्रुवारी रोजीच्या जयंती निमित्ताने दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘बाळशास्त्री जांभेकर : व्यक्ती आणि विचार’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान (Online lectures) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. चिंचोलकर (Prof. Dr. Ravindra Chincholkar) बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे (Prof.Dr. Anil Chikate) होते. यावेळी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, अमरावती येथील श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. कुमार बोबडे, नगर येथील न्यू आर्टस सायन्स कॉलेजचे प्रा.डॉ. बापू चंदनशिवे यांची विशेष उपस्थिती होती.

प्रा.डॉ. रवींद्र चिंचोलकर पुढे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या बुध्दिमत्तेची (intelligence) चुणूक इंग्रजी अधिकाज्यांच्या न्यायालयीन खटल्या संदर्भात साक्ष नोंदविताना दाखविली. त्यांनी पुढे विसाव्या वर्षी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ (Darpaṇa) या नावाने सुरू केले. जांभेकरांना मराठी व इंग्रजीसह इतर आठ भाषांचे ज्ञान होते. त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथ देखील लिहले. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यांनी वृत्तपत्र व पुस्तकांच्या माध्यमातून मौलिक कार्य केल्याचेही डॉ.चिंचोलकर यांनी सांगितले. बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेत (journalism) कधीही तडजोड केली नाही. त्यांनी सामाजिक प्रबोधनाची (social awakening) पत्रकारिता केली. राजा आणि प्रजा यांना जोडण्याचे काम (Addition work) त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले. त्यामुळे पत्रकारितेत बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श (Ideal) विद्याथ्र्यांनी डोळ्यासमोर ठेवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रा.डॉ अनिल चिकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार-संपादक सोबतच विद्यार्थी प्रिय शिक्षक (Teacher) देखील होते. त्यांनी मराठी भाषेच्या संर्वधनासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या (Marathi languages) विकास कार्याचा इतिहास लेखन करताना जांभेकरांच्या कार्याचा उल्लेख विशेषत्वाने होईल.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा.डॉ सुधीर भटकर यांनी, बाळशास्त्री जांभेकरांचा परिचय करून देत त्यांच्या साहित्यलेखन व पत्रकारितेच्या कार्याचा उल्लेख केला. सूत्रसंचालन प्रा.डॉ. विनोद निताळे, पाहुण्यांचा परिचय डॉ.गोपी सोरडे यांनी करून दिला. आभार डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मानले. कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठातील डॉ. अंबादास भासके, प्रा. तेजस्विनी कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com