महामार्गावर विचित्र अपघात; बस थेट शेतात घुसली

दुरदर्शन टॉवर जवळील घटना; दोघे जखमी; एमआयडीसी पोलिसात नोंद
महामार्गावर विचित्र अपघात; बस थेट शेतात घुसली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातून जाणार्‍या महामार्गावरील दुरदर्शन टॉवर जवळ रविवारी सकाळी विचीत्र अपघात (accidents) झाला. या अपघातात दुचाकीवरील (bike) दोघे जण जखमी झाले तर बस महामार्गालत असलेल्या थेट शेतात घुसल्याने बस (bus) मधील प्रवाश्यांचा जीव थोडक्यात वाचला. या अपघातात दुचाकीवरील जखमी दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अधिक माहिती अशी की, महामार्ग क्रमांक 6 वरून जळगावहून भुसावळकडे जात होती. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुरदर्शन टॉवर जवळ बोदवडकडून जळगावकडे येणारी दुचाकीने ओव्हरटेक करत बसच्या अचानक समोर आले. बस (एमएच 14 बीटी 0098) वरील चालकाने दोघांना वाचविण्याच्या प्रयत्न केला.

दोघांना वाचवितांना दुचाकीला बस कट लागला आणि बस थेट रस्त्यावरून खाली उतरत बाजूच्या शेतात घुसली. अचानक घडलेल्या या अपघातामूळे बस मधील प्रवाश्यांच्या जीव भांड्यात पडून भयभीत झाले होते तर तर बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.

दुचाकीवरील दोघी जखमी

या विचित्र अपघातात दुचाकीवरील कडू बावस्कर (वय-27) आणि भुरा राजपूत (वय-23) दोघे रा. नाडगाव ता. बोदवड हे जखमी झाले. कडू बावस्कार याचा प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने खासगी रूग्णालयात नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com