धान्य व्यापार्‍याची पावणेचार कोटीत फसवणूक

चौघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
धान्य व्यापार्‍याची पावणेचार कोटीत फसवणूक

जळगाव Jalgaon । प्रतिनिधी

धान्याचे व्यापारी Grain merchants असल्याचे सांगत धान्य विक्रेत्यांकडून कोट्यावधी रुपयांचा माल घेवून त्यांची फसवणूक करणार्‍या चौघांना आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली. त्यांनी जिल्ह्यातील चार व्यापार्‍यांची फसवणुक fraud केली असून याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात Dharangaon Police Station दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील प्रतिक राजेश भाटीया यांची धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे जोगेश्वरी जिनींग अ‍ॅन्ड प्रेसिंग नावाची फॅक्टरी असून ते धान्याचे घाऊक व्यापारी आहेत. ग्रामीण भागातून धान्य गोळा करुन ते धान्य इतर व्यापार्‍यांना विक्री करतात.

दरम्यान संशयीत आरोपी दिनेश कांतीलाल लुणावत रा. मनमाड याने प्रतिक यांच्याशी संपर्क साधत मी देखील धान्य विक्रीचा व्यापारी असून तुम्ही मला माल पुरवीज जा, मालाचे पैसे पंधरा दिवसाच्या आत देण्याबाबत त्यांच्यात बोलणी झाली.

त्यानुसार प्रतिक भाटीया हे निल ट्रेडर्सचे राहूल कांतीलाल लुणावत रा. नाशिक, सुमित एजन्सीचे सुमित राजेंद्र लुणावत, शुभम ट्रेडिंगचे शुभम राजेंद्र लुणावत व दिनेश कांतीलाल लुणावत तिघ रा. मनमाड यांना धान्याचा पुरवठा करीत होते.

पैशांसाठी टाळाटाळ

सुमारे वर्षभर लुणावत यांना प्रतिक भाटीया यांनी धान्याचा पुरवठा केला. दरम्यान या काळात सुरुवातीला संपुर्ण व्यवहार सुरळीत सुरु होता. त्यांच्याकडून भाटीया यांना मालाची पुर्ण रक्कम दिली जात होती. मात्र त्यानंतर लुणावत यांनी भाटीया यांच्याकडून सुमारे 3 कोटी 75 लाख 52 हजार 166 रुपयांचा माल घेतला.

परंतु लुणावत यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ करीत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने भाटीया यांना आपली फसणुक झाल्याचे समजले. त्यांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात फसवणुकीची तक्रार दिल्याने 16 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने हा गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. यात तपसात लुणावत यांना त्यांच्या म्हणणे सादर करण्यासाठी 26 जून रोजी आर्थीक गुन्हे शाखेने नोटीस बाजावित 31 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

परंतु लुणावत यांनी आणखी मुदत मागून घेतल्यानंतर आज ते चौकशीसाठी आर्थीक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले. त्यांच्याकडून तपासात उडवाउडवीची उत्तरे मिळत नसून ते सहकार्य करीत नसल्याने तसेच त्यांनी व्यवहार केलेल्या फर्मचे कुठलेच कागदपत्रे नसल्याने आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली.

फसवणुकीचे उघडकीस येण्याची शक्यता

आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या चौघ लुणावत बंधूंना उद्या शनिवारी धरणगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी केलेल्या फसवणुकीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्यानुसार तपास करीत आहे.

ही कामगिरी आर्थीक गुन्हे शाखेचे डिवायएसपी भास्कर डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, प्रवीण जगताप, दिनेश पाटील, शफी पठाण, ज्ञानेश्वर सोनार यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com