महिलेची 50 हजारात फसवणूक

चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
 महिलेची  50 हजारात फसवणूक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

शहरालगत असलेल्या टाकळी (Takli) प्र.चा.येथे एक महिलेला (Woman's) बँक (Bank)एटीएमचा पिन (ATM PIN) तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा (Police station) दाखल करण्यात आले आहे.

टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (वय-४३) या विवाहितेला ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजताच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (मो. ७८६६९९२३१८) एटीएम पिन तयार करून देतो म्हणून संदेश आला. तेव्हा वंदना विजय पाटील यांच्याकडून बँक खात्याची सर्व माहिती घेतली. व नो डेस्क नावाचे अप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यातुन ४९,९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला वंदना विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात भादवी कलम-४२० व आयटी ऍक्ट ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.