जळगावात व्यावसायिकाची 14 लाखांत फसवणूक

होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या बहाण्याने गंडा
जळगावात व्यावसायिकाची 14 लाखांत फसवणूक

जळगाव Jalgaon । प्रतिनिधी

होलसेल भावात टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic goods) विक्री करण्याच्या बहाण्याने शेख मोहम्मद वसीम मोहम्मद हारुन (Sheikh Mohammad Wasim Mohammad Harun) वय 39 रा. मेहरुण या व्यावसायिकाची 14 लाख 39 हजार 458 रुपयांत फसवणूक (Cheating) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (cyber police station) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. दरम्यान आमिषाला बळी पडून शेख वसीम यांनी त्यांच्या व्यवसायातुन कमविलेले पैसे तर गेलेच शिवाय नातेवाईक व मित्रांकडून हातऊसनवारीने घेतलेले पैसेही बुडाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, शेख मोहम्मद वसीम मोहम्मद हारुन हे मेहरुण परिसरातील इकबाल कॉलनी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते जुने एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज दुरूस्ती व विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शेख वसीम यांनी फेसबुकवर ए.सी. टेक्नीशिअन्स गु्रप नावाने फेसबुक पेज दिले. पेजची माहिती घेतली असता, गृपचा अ‍ॅडमीन हा सय्यद वसीम अब्दुल हा असून गृपवर विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू व स्पेअर पार्टची होलसेल दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. याठिकाणाहून होलसेलच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्यास व्यवसायात नफा होईल या उद्देशाने शेख वसीम यांनी गृप अ‍ॅडमीन सय्यद वसीम यास संपर्क साधला. त्यावर सय्यद वसीम याने न्यु नॅशनल कंपनीच्या किरकोळ डिफेक्टीव्ह इलेक्ट्रॉनिक माल उपलब्ध असून यात एसी, फ्रिज, एलईडी टीव्ह या वस्तूचा समावेश आहे. या वस्तू होलसेल विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. व संबंधित वस्तूंचेही फोटोही त्याने व्यावसायिक शेख वसीम यांना पाठविले.

अशी झाली फसवणुकीची खात्री

30 नोव्हेंबर 2021 रोजी व्यावसायिक शेख वसीम यांना गुजरात येथून विरल पटेल यांचा फोन आला. तुमचा मोबाईल व जीएसटी नंबर वापरुन सैय्यद वसीम अब्दुल याने मला बिल पाठविले आहे. सैय्यद वसीम हा फ्रॉड असून त्यानेही माझ्या प्रमाणे आणखी एका जणाची फसवणूक केल्याची माहिती विरल पटेल यांनी शेख वसीम यांना दिली. खात्रीसाठी विरल पटेल याने त्याला आलेले बिल सुध्दा शेख वसीम यांना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे पाठविले. पैसे पाठवूनही कुठलीही वस्तू शेख वसीम यांना मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री शेख वसीम यांना झाली. त्यानुसार तब्बल दोन ते तीन महिने वस्तू तसेच पैसे परत मिळतात का? याची प्रतिक्षा केली. मात्र कुठलाही उपयोग न झाल्याने 10 जानेवारी शेख वसीम यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक करणार्‍या सैय्यद वसीम अब्दुल नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

खात्री न करता पैसे पाठविले

छायाचित्रातील वस्तू पसंत पडल्याने व्यावसायिक शेख वसीम यांनी सैय्यद वसीम यांना 100 नग टीव्ही, 250 नग फ्रीज, 100 नग एसी या वस्तूची ऑर्डर दिली. सैय्यद वसीम याने या वस्तूंचे अ‍ॅडव्हान्स पेमेंटसाठी त्याचा बँक खाते क्रमांक, फोन पे, गुगल पे असलेला मोबाईल नंबर शेख वसीम यांना पाठविला. त्यानुसार शेख वसीम यांनी 25 जानेवारी 2021 ते 11 मे 2021 या काळात 14 लाख 39 हजार 458 रुपयांची रक्कम सैय्यद वसीम यांच्या बँक खात्यावर जमा केली, तसेच काही रक्कम फोन पे गुगल पेच्या माध्यमातून पाठविली. यात 5 लाख 19 हजार 458 रुपये हे शेख वसीम यांचे व्यवसायाच्या बचतीतील तर उर्वरीत 9 लाख 20 हजार रुपयांची रक्कम ही नातेवाईक, मित्र परिवाराकडून हातऊसनवारीवर घेतली होती. याबदल्यात सैय्यद वसीम याने शेख वसीम यांना कंपनीच्या पत्ता व नाव असलेले 24 लाख रुपये रकमेचे बील सुध्दा पाठविले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com