
जळगाव - Jalgaon
चौथी राष्ट्रीय हातमाग गणना-2017 संपूर्ण देशात आयोजित करण्यात आली होती. या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये मे. कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस लि. हैद्राबाद या संस्थेमार्फत पुर्ण झाले आहे.
तथापि, या हातमाग गणनेतून सुटलेले, अनावधानाने रहिलेले हातमाग विणकरांना समाविष्ट करण्यासाठी सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर, मजूर यांना अंतिम संधी देण्यात येत आहे.
ज्या विणकरांचा समावेश हातमाग गणनेत झालेला नसेल त्यांनी जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था/उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तसेच प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, दुरध्वनी क्रमांक- 022-25405363 वर संपर्क साधावा. विहित नमुन्याचा अर्ज घेऊन तो संपुर्ण माहिती भरून छायांकित कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्तावर व rddtextiles3mumbai@rediffmail.com या ईमेलव्दारे 10 दिवसांच्या आत पाठविण्यात यावा. असे सु. म. तांबे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.