चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ; युवकांवर गुहे दाखल
चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

पाचोरा Pachora प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील  कजगांव बसस्थानक (Kazgaon Bus Stand) परिसरातील अतिक्रमण काढावे (Encroachment should be removed)  या मागणीसाठी तक्रारदार यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय भडगाव तहसीलदार, बीडीओ कार्यालयात तक्रारी (Complaints) करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही म्हणून शेवटी दि.२३ मंगळवार रोजी दुपारी एक ते दीड वाजे सुमारास कजगांवच्या  चार युवकांनी (Four youths) पाचोरा प्रांताधिकारी  कार्यालया (Pachora District Magistrate Offices) समोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन (Attempted self-immolation) करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांचा हस्तक्षेप (Police intervention) आणि सतर्कतेमुळे  पुढील अनर्थ टळला.चारही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. 

चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
Bad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी मुख्य  तक्रारदार भूषण नामदेव पाटील सोबत स्वप्निल प्रल्हाद पाटील,चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व राहणार कजगाव  यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे.

अतिक्रमण काढण्याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी देखील तक्रारदाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना दिलेली आश्वासने प्रशासनाने कागदावरच ठेवत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.

चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
गावठी कट्टा घेऊन फिरणारा बोदवड पोलिसांकडून जेरबंद

कजगाव मोठी लोकवस्तीचे आणि  सुमारे २०/ २५ खेडी लागून असलेले मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे रेल्वे स्टेशन आहे.   बसस्थानक परिसर अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने नागरिक, प्रवाश्यांना  बसण्यास व उभे राहण्यास देखील जागा शोधून सापडत नाही. बसस्थानक आहे पण अतिक्रमणामुळे तेथे बस जाऊ शकत नसल्याने बसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रहदारीच्या रस्त्यावर जीव मुठीत ठेवून उभे रहावे लागते.

या सर्व अडचणी पाहता जनहितासाठी बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी करूनही प्रशासन दखल घेत नाही म्हणून अखेर संबंधित तरुणांनी मंगळवारी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने तरुणांच्या आत्मदहनाचा प्रयत्न फसला. आत्मदहन करण्याचा प्रयत्नामुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली होती.

 अतिक्रमण काढण्यासाठी कजगावच्या चार तरुणांच्या आत्मदहन प्रयत्न प्रकरणी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी माहिती दिली कि, गेल्या दहा दिवसापूर्वी यातील एक तक्रादाराने प्रांताधिकारी कार्यालयाला अतिक्रमण बाबत निवेदन दिले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मी भडगाव तहसीलदार व बीडीओ यांना या विषया बाबत पत्रव्यवहार करून बैठक   घेण्याच्या सूचना केल्या प्रमाणे त्यांनी बैठक घेतली होती. हा विषय पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयाशी संबंधित नसून कजगांव ग्राम पंचायत, भडगाव बीडीओ, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारीतील आहे.

 विक्रम बांदल प्रांताधिकारी -पाचोरा विभाग  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com