जळगाव jalgaon। प्रतिनिधी
रावेर परिसरासह चिनावल, वडगांव, वाघोदा येथे मागील वर्षापासून ते आजवर तसेच दि 30 जानेवारी रोजी वडगांव शिवारातील तीन शेतकर्यांचे 4000 केळी खोड (banana trunks) कापून (cut and thrown )सुमारे 10 लाखाचे नुकसान अपप्रवृत्तीच्या लोकांनी केले आहे. या अपप्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त स्थानिक प्रशासनाकडून होत नसल्याने चिनावल व परिसरातील शेतकर्यांनी आणि खा. रक्षा खडसे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन दिले.
चिनावल व परिसरात नेहमीच होणार्या शेतकर्यांच्या केळीचे उभे पिक कापून नुकसान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. काही अपप्रवृत्तीचे लोक रात्री च्या वेळी नुकसान करीत लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे. या बाबत स्थानिक पोलिस प्रशासनामार्फत ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगार राजरोसपणे फिरत आहेत. या गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे 200 शेतकरी भारतीय किसान मोर्चाचे माध्यमातून धडकले. याठिकाणी जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
खा. रक्षा खडसे, भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष वैभव महाजन, तालुका अध्यक्ष राहुल महाजन, सचिव भास्कर सरोदे, ललीत चौधरी, माजी जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कृउबा माजी सभापती गोपाळ नेमाडे, नुकसान ग्रस्त शेतकरी पकंज नारखेडे, दगडू पाटील, डॉ मनोहर पाटील तसेच माजी सरपंच योगेश बोरोले, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे, डॉ शेखर पाटील, कालीदास ठाकूर, डिगा महाजन, उपसरपंच परेश महाजन, सचिन चौधरी, विजय चौधरी, सचिन पाटील, प्रशांत तायडे, पकंज झोपे, दिग्विजय चौधरी, भरत बोडें, राहुल पाटील, हरीश धाडे, सचिन बर्हाटे, प्रकाश भंगाळे, गंगाराम राणे, लोकेश पाटील, योगेश भंगाळे, संदिप महाजन, दिनेश महाजन, अमोल महाजन, गुणवंत नेमाडे, संदिप टोके, जितेंद्र वानखेडे, युवराज महाजन, ललीत झाबंरे यांचे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
आरोपींवर एमपीडीए ( मोक्का ) लावण्याचा विचार जिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्यांनी लवकरच आरोपी निष्पन्न होतील. तसेच आवश्यक त्या सर्व उपाय योजना आखून शेतकर्यांना या पुढे असे प्रकार घडणार नाही. यासाठी वेळ पडल्यास एखादे वेळी आरोपींवर एमपीडीए ( मोक्का ) लावण्याचा विचार केला जाईल असेही आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले.
अमन मित्तल जिल्हाधिकारी