गोळीबारप्रकरणातील चार संशयित जालना कारागृहात

कोरोना अन् कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षात घेता न्यायालयाचे आदेश
गोळीबारप्रकरणातील चार संशयित जालना कारागृहात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळ्यात उपमहापौर कुलभूषण पाटील Deputy Mayor Kulbhushan Patil यांच्यावर गोळीबार प्रकरणी In the shooting case दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य संशयितांसह main suspects चार जणांना रविवारी जालना येथील कारागृहात In the jail at Jalna हलविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तसेच जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षात घेता, न्यायालयाच्या आदेशाने By court order चौघांना जालना कारागृहात हलविण्यात आल्याची माहिती तपासधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी Investigating Officer Assistant Police Inspector Sandeep Pardeshi यांनी बोलतांना दिली.

पिंप्राळ्यातील मयुर कॉलनी येथे 25 जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उमेश पांडुरंग राजपूत, महेंद्र पांडुरंग राजपूत, भूषण बिर्‍हाडे व मंगल युवराज राजपूत सर्व रा. पिंप्राळा या चौघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत पोलिसांनी किरण शरद राजपूत तसेच जुगल संजय बागूल हे आणखी दोन संशयित निष्पन्न केले होते. 26 जुलै रोजी या गुन्हयात संशयित उमेश राजपूत व किरण राजपूत या दोघांना जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून अटक करण्यात आली होती. तर मुख्य संशयित महेंद्र राजपूत यास 28 जुलै रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास म्हसावद येथून गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकीसह अटक करण्यात आली होती. 5 ऑगस्ट रोजी संशयित मंगलसिंग राजपूत हा पोलिसांना शरण आला होता. गुन्हयातील तपासात निष्पन्न करण्यात आलेला संशयित जुगल बागुल हा 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पोलिसांना शरण आला होता. संशयितांकडून गुन्ह्यात पिस्तोल जप्त करण्यात आले असून अटकेतील सर्व संशयित सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. तर या गुन्ह्यात भूषण बिर्‍हाडे हा संशयित अद्यापर्यंत फरार आहे.

आरोपींची कारागृहात रवानगी

न्यायालयीन कोठडीत जळगाव कारागृहात असलेल्या संशयितांपैकी गुन्ह्यातील मुख्य संशयित महेंद्र राजपूत, उमेश राजपूत, किरण राजपूत व मंगलसिंग राजपूत या चौघांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा कारागृहातील कैद्याची संख्या लक्षात घेता न्यायालयाच्या आदेशाने रविवारी जालना कारागृहात हलविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी यांच्यास कर्मचार्‍यांचे पथक चौघा संशयितांना जालना येथील कारागृहात दाखल करण्यासाठी रवाना झाले असून दाखल करण्याची कारवाई सुरु होती. या संशयितांची न्यायालयीन तसेच इतर कामकाजाची प्रक्रिया ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पध्दतीने होणार असल्याचेही तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी बोलतांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com