राजस्थानातील पुष्कर येथून भडगावकडे जाणाऱ्या वाहनातून १४ तलवारींसह चार जण जेरबंद

सत्रासेंन फॉरेस्ट नाक्यावरील कारवाई
राजस्थानातील पुष्कर येथून भडगावकडे जाणाऱ्या वाहनातून १४ तलवारींसह चार जण जेरबंद

चोपडा chopda ( प्रतिनिधी )
राजस्थानातील (Rajasthan) पुष्कर (Pushkar) येथून तलवारी (Sword) खरेदी करून पाच जण ओमनी गाडीत मागच्या सीट व पत्र्यामध्ये लपवून सातपुड्यातील सत्रासेंन मार्गे भडगावकडे विक्रीसाठी (For sale) घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले (Assistant Superintendent of Police Krishikesh Rawale) यांना मिळाली. गोपनीय माहिती च्या आधारे सत्रासेंन फॉरेस्ट (Satrasen Forest Nakya) नाक्यावर सापळा रचून येणाऱ्या ओमनी गाडीची पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यात १४ तलवारींसह (Sword) साडेतीन लाखा च्या मुद्देमालासह चार जणांना (To four) शिताफीने अटक (Arrested) करण्यात आली. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.दरम्यान या घटनेने चोपड्यात प्रचंड खडबळ उडाली आहे.

चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले यांना मिळालेल्या गोपनीय महिती वरून राजस्थान मधील पुष्कर येथून १४ तलवारी खरेदी करून मुस्ताकीन खान रा.आस्थानगर चाळीसगाव,आरिफ इब्राहिम पिंजारी घाटरोड, चाळीसगाव,मेहबूब खान हरीम खान जमिलखान घाटरोड,चाळीसगाव,सलमान खान अय्यूब खान इस्लामपूरा,चाळीसगाव, मुशरीफ खान रा.भडगाव मारुती ओमनी क्रमांक-एम.एच.१९ सीएफ ४५७१ मधून मध्यप्रदेश सीमेवरील सत्रासेंनकडून भडगावकडे जात असल्याची माहिती मिळाली. माहिती वरून सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर,पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे व पोलिसांनी सापळा लावून सत्रासेंन फॉरेस्ट नाक्यावर मारुती ओमनी क्रमांक एम.एच. १९ सीएफ ४५७१ आली असता पोलिसांनी गाडीला थांबवून संबंधितांना विचारपूस करून कसून चौकशी करीत असतांना गाडीच्या मागील सीट व पत्र्याच्या मध्ये १४ लपविलेल्या आढळून आल्या यावेळी गाडीतील पाच जणांपैकी मुशरीफ खान रा.भडगाव लघुशंकाच्या नावाने थोड्या अंतरावर जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला.
तर उर्वरित चार संशयितांना १४ तलवारी,चार मोबाईल सह साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह
चौघांना ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी पो.ना.राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग-५
गुरनं.०२/२०२२ नुसार मुस्ताकीन खान रा. आस्थानगर,चाळीसगाव,आरिफ इब्राहिम पिंजारी घाटरोड चाळीसगाव,मेहबूब खान,हरीम खान जमिल खान घाटरोड चाळीसगाव,सलमान खान अय्यूब खान इस्लामपूरा चाळीसगाव यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५,
७/२५ भादंवि कलम ३४ प्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौघां संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व हवालदार लक्ष्मण शिंगाणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com