जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे बाधित रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे बाधित रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात 4 बाधित रुग्णांची कोरोनावर मात केली असून 13 तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात रविवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये अमळनेर 1 तर चाळीसगाव तालुक्यात 3 असे एकूण 4 रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 13 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 605 एवढी झाली आहे. दुसरीकडे 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1 लाख 39 हजार 953 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 77 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com