जिल्ह्यात साडेचार लाख विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

ठेक्याची मुदत संपल्याने विद्यार्थी वेठीस : निविदा प्रक्रियेला मुहूर्त गवसेना
जिल्ह्यात साडेचार लाख विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित
संग्रहित

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार (School nutrition diet)पुरविला जातो. परंतु तांदूळ व इतर धान्यदी मालाचा पुरवठा करण्याची निविदा (Tender) जुलै महिन्यापासून संपलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 4 लाख 75 हजार विद्यार्थी लाभार्थी ऑगस्ट महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित (Deprived of nutritious food) आहे. शिक्षण विभागाकडून अद्यापही शालेय पोषण आहाराची निविदा प्रक्रिया(Tender process) राबविण्यात आलेली नसल्याने ठेक्याअभावी पोषण आहारासाठी विद्यार्थी वेठीस धरले जात असल्याचे विदारक चित्र आहे. या शालेय पोषण आहार निविदा प्रक्रियेला मुहूर्त गवसेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पोषण आहार पुरविण्यात राज्यशासन पूर्णतः अपयशी

जल्ह्यातील 4 लाख 75 हजार विद्यार्थ्यांचा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापासून रखडलाय यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजूमामा भोळे यांनी राज्यशासनाला केला आहे. जिल्ह्यातील 4 लाख 75 हजार विद्यार्थी लाभार्थी ऑगस्ट महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित आहे. शासनाने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे व कुपोषित मुलांचेप्रमाण कमी व्हावे, हा उद्देश ठेवून शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली आहे. यामध्ये मुलांना ठरल्या प्रमाणात व वेळेवर पोषण आहार मिळाला पाहिजे. परंतु सध्या असे होत नसून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडे पैसे नाहीत का?, जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्यात जबाबदार कोण? असा प्रश्न आमदार भोळे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळात कागदोपत्री आहार

शासनाने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे व कुपोषित मुलांचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश ठेवून शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली आहे. मात्र, जिल्ह्यात शालेय पोषण आहार पुरविण्याचा ठेक्याची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात आलेली असतानाही नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याविषयी संबंधीत यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षात कोरोना काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार कागदोपत्री पुरविण्यात आलेला असल्याचे पंचायतराज समितीच्या दृष्टीपथास आल्याने शिक्षण विभागाला रडारवर घेत ताशेरे ओढले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या कामचुकार अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नूतन सीईओ डॉ. पंकज आशिया यांचे वाढत्या कुषोषणाने स्वागत झाले. मात्र,त्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कुपोषण मुक्तीचा ध्यास घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com