
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी -
चाळीसगाव शहरात भरवस्तीत असलेल्या बाजाज गॅस एजन्सीच्या (Bajaj Gas Agency) ऑफीसमध्ये घुसून एकाने मॅनेजरला शिवीगाळ करत, चाकूचा (knife) धाक दाखवत, किरकोळ जखमी करुन ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. हि घटना दि. २६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चाळीसगाव (chalsigaon) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक किशन छाबडीया हे चाळीसगाव येथील मालेगाव रोडवर वाय पॉंईटवर वर बाजज गैस एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, दिवसभराचा गैस एजन्सीचा सर्व आर्थिक व्यवाहार त्यांच्याकडेच असतो. दि,२६ रोजी गैस एजन्सीमध्ये सिलेंडरडिलेवरीचे पैसे मोजण्याचे काम सुरु असताना, मनोज माखीजा रा.सिंधी कॉलनी, मु.रा.उल्हासनगर हा गैस ऐजन्सीच्या ऑफीसमध्ये हातात चाकु घेवून घुसला आणि शटर बंद केले.
चाकू अशोक छाबडियाना लावत, किरकोळ जखमी केले. तसेच शिवीगाळ केली आणि गल्यातील रोकड व अशोक यांच्या मोटार सायंकलची चावी बळजबरीने हिसाकावून घेतली. अशोक यांना जिवेमारण्याची धमकी देत, ऑफीसचे शटर बंद करुन, ३ लाख ६५ हजार रुपये रोख व ७५ हजार रुपये किमतीची मोटार सायंकल असा एकूण ४ लाख ४० हजार मुद्देमाल घेवून पसार झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अशोक छाबडीया यांच्याी फिर्यादीवरुन मनोज माखीजा याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. परंतू शहर पोलिसांकडून चोरीच्या गुन्हांची उकल होत नसल्यामुळे चोरट्यांना पोलिसांची धाक वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ आधिकार्यांनी याकडे लक्ष देवून, चोरीच्या गुन्हांची उकल करण्यासाठी सक्षम आधिकार्यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.